Arjun Kapoor sells off his swanky Bandra apartment for Rs 16 cr
Arjun Kapoor sells off his swanky Bandra apartment for Rs 16 cr Google
मनोरंजन

Arjun Kapoor ने करोडोंना विकला मुंबईतला फ्लॅट, या इमारतीत सगळेच Celebrity

प्रणाली मोरे

(Bollywood)बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने(Arjun Kapoor) मुंबईतील ब्रान्द्रा पश्चिमेमधील एका आलिशान इमारतीतील आपला फ्लॅट(Flat) १६ करोड रुपयांना विकल्याची(Sell) बातमी आहे. अर्जुन कपूरचा हा ४३६४ स्क्वे.फूटचा फ्लॅट केसी मार्गावरील 81 Aureate इमारतीत १९ व्या मजल्यावर होता. बातमी समोर आली आहे की, १९ मे रोजी सेल डॉक्युमेंट रजिस्टर झाले आहेत. ज्यांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे त्यांचे नाव शंकर भोर आणि सत्यन भोर आहे. त्यांना इमारतीत ३ कार पार्कींग करण्यासाठी जागा मिळाली आहे. अर्जुनची बहिण अंशुला कपूरने सेल्स डॉक्युमेंट्सवर सह्या केल्या आहेत. अपार्टमेंटच्या रजिस्ट्रेशनसाठी ९६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे.(Arjun Kapoor sells off his swanky Bandra apartment for Rs 16 cr)

बोललं जात आहे की या फ्लॅटमध्ये अर्जुन कपूर रहायचा नाही. तो जुहू मध्ये रहेजा ऑर्किड इमारतीत ७ व्या मजल्यावर राहतो. अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोराचा देखील फ्लॅट 81 Aureate बिल्डिंगमध्ये आहे. मलायकाने हा फ्लॅट १४.५ करोड रुपयांना बुक केला होता. पण बिल्डरने वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नव्हता म्हणून तिने त्याच्या विरोधात तक्रार देखील केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला आणि मलायकाला फ्लॅटचा ताबा अखेर मिळाला होता.

टी.व्ही अभिनेता करण कुंद्राने देखील याच इमारतीत १४ करोडला फ्लॅट विकत घेतला आहे, याच्या एक आठवडा आधीच अर्जुनने आपला फ्लॅट १६ करोडला विकला होता. करण कुंद्राने ५२३८ स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकत घेतला आहे. त्याला देखील ३ कार पार्कींगचा एक्सेस मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने(Sonakshi Sinha) या बिल्डिंगमध्ये १४ करोडला ४६२८ स्क्वेअर फीटचा फ्लॅट १६ व्या मजल्यावर विकत घेतला होता.

यावर्षी मार्च मध्ये क्रिकेटर पृथ्वी शॉ ने याच इमारतीत २२०९ स्क्वेअर फीटचा फ्लॅट १०.५ करोडला विकत घेतला होताय यामुळे बोललं जात आहे की बान्द्याच्या या विभागात बॉलीवूडपासून टी.व्ही कलाकार,क्रिकेटर्स, आणि बरेच सेलिब्रिटी राहणं पसंत करतात.

अर्जुन कपूरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर 'एक विल्हन रिटर्न्स' सिनेमात तो दिसणार आहे. मोहित सूरीच्या या अॅक्शनपटात जॉन अब्राहम,दिशा पटानी,तारा सुतारिया असे कलाकार आहेत. अर्जुन सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. अर्जुन कपूर आसमान भारद्वाज दिग्दर्शित 'कुत्ते' सिनेमातही काम करतोय. या सिनेमात त्याच्यासोबत नसीरुद्दीन शहा,राधिका मदान,तब्बू असे कलाकारही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमांसोबतच अर्जुन कपूर मलायका सोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत दिसतो. दोघांना अनेक इव्हेंटमध्ये एकत्र पाहिलं जातं. त्या दोघांचे हॉलिडेजचे फोटोही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT