asha bhosle recall memories of lata mangeshkar  sakal
मनोरंजन

आम्ही आई वडिलांचे पाय धुवून पाणी प्यायलो, आशा भोसले झाल्या भावूक

एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

नीलेश अडसूळ

asha bhosle : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांना जाऊन काही महिने उलटले तरी अद्याप त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघालेली नाही, मंगेशकर कुटुंबीय अजूनही त्या दुःखातून बाहेर आलेले नाही. त्यातही आशा भोसले आणि लता दीदी या बहिणींचे प्रेम काही वेगळेच आहे. लता दीदींच्या जाण्यानंतर अनेकदा आशा भोसले भर मंचावर भावूक झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे.

स्टार प्लस (star plus) वाहिनीने लता दिदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'नाम रह जाएगा' (naam rah jayega) हा कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमात सोनू निगम, शंकर महादेवन, अलका याज्ञीक, कुमार शानू, अमित कुमार यांच्यासह जवळपास १८ प्रसिद्ध भारतीय गायक सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात आशाबाई बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''लता दीदी एक सर्वसाधारण आयुष्य जगत होत्या. सुरुवातीला दिदी ८० रुपये महिना कमावयच्या. आम्ही ५ माणसं होतो आणि तेवढ्याच पैशात आम्हाला घरखर्च चालवावा लागत असे. आमच्याकडे बरेच नातेवाईक यायचे अशावेळीही दिदी काही बोलत नसे. अनेकदा अशीही वेळ यायची की आम्ही २ आण्यांचे कुरमुरे विकत घ्यायचो आणि चहासोबत ते खाऊन झोपून जायचो.'

पुढे त्या म्हणाल्या, 'लता दिदींनी एकदा कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही तुमच्या आई- वडिलांचे पाय धुवून ते पाणी प्यायलं तर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. तेव्हा त्यांनी मला पाणी आणण्यास सांगितंल. दीदींनी एक ताट घेतलं आणि आई- वडिलांचे पाय धुतले आणि स्वतः ते पाणी प्यायला आणि आम्हा सर्व भावंडांना ते पाणी पिण्यास सांगितलं. कदाचित आम्ही त्यामुळेच यशस्वी आहोत,' असे अशा भोसले म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT