Ashish Vidyarthi Bollywood Actor second Wedding 
मनोरंजन

Ashish Vidyarthi Memes : म्हाताऱ्या वाघानं हरिणीची केली शिकार! संसारात पुन्हा 'विद्यार्थी'

बॉलीवूडमध्ये जे प्रसिद्ध खलनायक आहेत त्यात आशिष विद्यार्थी यांचे नाव घ्यावे लागेल, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

युगंधर ताजणे

Ashish Vidyarthi Bollywood Actor second Wedding : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी हे आता त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले आहे. वयाच्या साठीमध्ये दुसरे लग्न हे अनेकांसाठी ट्रोलिंगचा विषय ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर विद्यार्थी यांच्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. रुपाली बरुआ असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे.

बॉलीवूडमध्ये जे प्रसिद्ध खलनायक आहेत त्यात आशिष विद्यार्थी यांचे नाव घ्यावे लागेल, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चित्रपट, नाटक, टीव्ही मनोरंजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आशिष विद्यार्थी नेहमीच प्रसिद्ध राहिले आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

केवळ हिंदी नाहीतर मराठी, इंग्रजी, गुजराती,तमिळ चित्रपटांमध्ये त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. गेल्या काही वर्षांपासून आशिष हे वेबसीरिजमध्ये जास्त काळ कार्यरत असल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांची ओळख फॅशन डिझायनर रुपालीशी झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. काल आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वेगळ्याच चर्चांना उधाण आले.

वयाच्या साठीमध्ये दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या आशिष विद्यार्थी यांच्यावर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मीम्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात त्यांना त्यांच्या वयावरुन ट्रोल करण्यात आले. वडीलधाऱ्या माणसांन पुन्हा प्रेमात पडून लग्नाच्या मुंडावळ्या बांधणं यासाठी आशिष यांचे अभिनंदन करावे लागेल. आशिष हे संसारात अजुनही विद्यार्थीच असल्याची मिश्किल टिप्पणीही नेटकऱ्यांनी केली आहे. त्यामुळेच की काय त्यांचे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT