Siddharth shukla, Asim Riaz  Google
मनोरंजन

Siddharth Shukla विषयी आसिम रियाझचा हैराणा करणारा खुलासा..म्हणाला,'त्याच्या मृत्यूआधीच मला माहित होतं की..'

आसिम रियाझ आणि दिवंगत सिद्धार्थ शुक्ला हे दोघे बिग बॉस सीझन १३ चे स्पर्धक होते. त्यांच्यात जितके वाद रंगले..तितकंच त्यांचं बॉन्डिंगही उत्तम जुळलं होतं.

प्रणाली मोरे

Asim Riaz On Siddharth Shukla Death: बिग बॉस १६ आता संपलेलं आहे. पण चाहते मात्र प्रत्येक सिझनमधल्या आपल्या फेव्हरेट स्पर्धकासोबत कायम जोडले जातात.

बिग बॉस सिझन १३ ला कोण विसरू शकतं. या सिझनचा विनर सिद्धार्थ शुक्ला होता..ज्याला चाहत्यांचा खूप पाठिंबा आणि प्रेम मिळालं. पण आता तो या जगात हयात नाही. आणि चाहते त्याला खूप मिस करत आहेत.

याच शो मध्ये सिद्धार्थसोबत आसिम रियाज देखील होता. तो शो चा रनरअप ठरला होता. शो मध्ये भले दोघांमध्ये वाद झाले होते पण अनेकदा त्यांच्यातील बॉन्डिंगही लोकांचे मन जिंकून गेले. आता नुकतंच एका मुलाखतीत आसिम रियाजनं आपला मित्र सिद्धार्थचं स्मरण करण अनेक खुलासे देखील केले आहेत. (Asim Riaz reveal siddharth shukla death bigg boss 13)

आसिम रियाज म्हणाला- ''सिद्धार्थ माझ्या स्वप्नात आला होता. मी माझ्या आईची आणि भावाची शपथ घेऊन ही गोष्ट शेअर केली होती, मला आधीपासून माहित होतं. मला माझ्या चुलत भावाचा फोन आला आणि त्याने मला न्यूज कन्फर्म करायला सांगितलं..पण त्याच्याआधी मला ती गोष्ट माहित होती''.

''त्याने मला थेट त्या वाईट बातमी विषयी सांगितलं नाही कारण त्याला माहितीय मी खूप भावूक आहे. आणि मी सिद्धार्थसोबत बिग बॉसच्या घरात एकत्र खूप वेळ घालवला आहे. आणि सिद्धार्थसोबत नंतर नंतर माझं बॉन्डिंग खूप चांगलं जोडलं गेलं होतं''.

'' माझ्या आयुष्यात कोणी माझा खास मित्र असा नव्हता. जे कनेक्शन मी सिद्धार्थसोबत फील केलं तसं कोणासोबत केलं नव्हतं. त्याच्यासोबत जितकं भांडलोय तितकंच आम्ही एकत्र मिळून हसलोय''.

यानंतर आसिम म्हणाला-''सिद्धार्थ माझ्या स्वप्नात आला होता. सिद्धार्थनं मला येऊन मिठी मारली होती. मी अल्लाहची शपथ घेतो. त्यानं तसंच केलं होतं. सिद्धार्थच्या निधनानंतर माझ्या चुलत भावाचं देखील निधन झाले''.

'' त्यानंतर माझ्या एका मित्राचं निधनही झालं. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर मी माझ्या जवळच्या ४ जणांना गमावलं. आणि माझं आयुष्य बदललं. मी विचार करत होते की मी काय करतोय? कोणाला ठाऊक मलाही काही झालं तर''.

'बिग बॉस सिझन १३ हा सर्वाधिक पॉप्युलर सिझन राहिला आहे. त्यावेळी शो ची टीआरपी खूप चांगली होती. या शो चा विनर सिद्धार्थ शुक्ला होता. आणि आसिम रियाज रनरअप.

या शोमुळे शहनाज गिलही खूप प्रसिद्ध झाली होती. आधी तिला पंजाबची कतरिना कैफ म्हणून लोक संबोधायचे पण आता ती तिच्या नावानं घराघरात प्रसिद्ध आहे. सिद्धार्थ शुक्लासोबत तिचं बॉन्डिंग खूप खास होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT