Ayesha Kapoor Casting Couch esakal
मनोरंजन

Ayesha Kapoor Casting Couch : 'माझी बायको हो, मग तुला...' प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली ऑफर

मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काऊचच्या नावाखाली त्रास देण्याचे, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे अनेक प्रसंग दिसून आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ayesha Kapoor Casting Couch : मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काऊचच्या नावाखाली त्रास देण्याचे, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे अनेक प्रसंग दिसून आले आहेत. त्यात काही दिग्गज अभिनेत्रींच्या नावाचा देखील समावेश आहे. आता पुन्हा एका अभिनेत्रीनं तिच्यावर झालेल्या मी टूच्या आरोपांविषयी, आणि कास्टिंग काऊचविषयी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर यापूर्वी बॉलीवूडमधील कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या कास्टिंग काऊचविषयी भाष्य केलं आहे. आता त्यात आयशा कपूर नावाच्या अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. तिनं आपल्याला बॉलीवूडमध्ये एका कास्टिंग डिरेक्टरनं कशाप्रकारे मानसिक आणि शाररिक त्रास दिला याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Also Read - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत पडद्याआड काय घडते याबाबत अनेकांना माहिती नसते. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाबत घडलेल्या प्रकारानं चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. आज बॉलीवूडमध्ये ज्या टॉपच्या अभिनेत्री आहेत. त्यांना देखील कास्टिंग काऊच सारख्या प्रकारांना सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. शोबिजच्या दुनियेमध्ये जेव्हा अशाप्रकारचे काही प्रसंग घडतात त्यानंतर त्याची बराचकाळ चर्चा होत राहते.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या सादरीकरणामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या आयशा कपूरनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं आपल्याला निर्मात्यानं चित्रपटामध्ये काम देण्यासाठी चक्क लग्नाची मागणी घातली होती. माझी बायको झाल्यास तुला हवा तो रोल तू करु शकतेस अशी अट त्या कास्टिंग डिरेक्टरनं ठेवल्याचा धक्कादायक खुलासा आयशानं केला आहे.

आयशानं वेगवेगळ्या मालिकांमध्ये आणि सीरिजमध्ये काम केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या अभिनयाचे कौतूकही झाले आहे. यासगळ्यात एक मालिकेमध्ये लीड रोलसाठी जेव्हा तिच्या नावाची चर्चा सुरु झाली तेव्हा कास्टिंग डिरेक्टरनं तिला थेट लग्नाची मागणी घातली होती. असा खुलासा आयशानं केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT