ayushmann khurrana jackie shroff savita bajaj  file image
मनोरंजन

सविता बजाज यांच्या मदतीला धावून आले बॉलिवूड कलाकार

आयुषमान खुराना, जॅकी श्रॉफ यांनी केली आर्थिक मदत

प्रियांका कुलकर्णी

कोरोना काळात मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज (savita bajaj) यांनी आर्थिक अडचणींबद्दल सांगितले होते. म्हातारपणी आपल्याकडे पैसे नाहीत, अशी खंत त्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली होती. सविता यांनी कोरोनावर मात केली. तसेच त्यांना फुफ्फुसांचा आजारदेखील आहे. हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्यांना अडचण येत होती. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराच्या खर्चासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार धावून आले आहेत. (ayushmann khurrana jackie shroff send financial help to ailing actor savita bajaj pvk99 )

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनच्या (CINTAA) नुपूर अलंकार यांनी रुग्णालयात असताना सविता यांची काळजी घेतली. अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांनी सविता यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आयुषमान खुरानाने त्यांना फोन केला आणि त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. तसेच जॅकी श्रॉफने देखील मदत केली आहे. सोनू सूदने ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदत केली, असे त्यांनी सांगितले. आता सविता यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

सविता बजाज यांनी निशांत (nishant) , नजराना (najarana) आणि बेटा हो तो ऐसा (beta ho to aisa) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच नुक्कड (nukkad), मायका (mayka) आणि कवच या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadohi Renamed,: जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर ५ व्यांदा बदलले नाव; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

IND vs WI : भारत अन् वेस्ट इंडिज संघावर आयसीसीने केली कारवाई; वन डे मालिकेत नेमकं असं काय घडलेलं?

Paithan Accident: पैठणमध्ये एसटी-दुचाकीची भीषण धडक; दोन तरुणांसह दोन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

व्हिटॅमिन E कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावू शकतो का? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पद्धत

Latest Marathi News Live Update : भैय्या माने यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू?

SCROLL FOR NEXT