nikhil bane, Maharashtrachi Hasyajatra, nikhil bane news SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra फेम निखिल बनेच्या घरी असं काय घडलं कि थेट भांडुपचे पोलीस घरी आले

निखिल बनेच्या घरी थेट भांडुप पोलीस अधिकारी आले होते

Devendra Jadhav

Nikhil Bane News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या खूप आवडीचा. हास्यजत्रेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. हास्यजत्रेतील असाच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे निखिल बने.

निखिल बनेने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हास्यजत्रेत लोकप्रिय कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःची ओळख निर्माण केलीय. निखिल बनेच्या घरी थेट भांडुप पोलीस अधिकारी आले होते.. काय झालं नेमकं? बघूया

(bhandup police officer visit maharashtrachi hasyajatra fame nikhil bane home)

निखिल आज लोकप्रिय कलाकार झाला असला तरीही तो भांडूपच्या चाळीत राहतो. निखिलच्या याच चाळीतल्या घरी त्याला भेटायला भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन उनवणे गेले होते.

पोलीस अधिकारी नितीन हे स्वत: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे खूप मोठे फॅन आहेत. नितीन यांनी त्यांच्या विभागाचं नाव मोठं करणारा निखिल बनेची त्याच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्याचे आई बाबा सुद्धा सोबत होते.

निखिल बनेने हा खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेयर केलाय. हा फोटो शेयर करत निखिलने त्याच्या भावना व्यक्त केल्यात..

निखिल लिहितो.. आज भांडुप पोलिस स्टेशनचे सिनियर पोलिस इन्स्पेक्टर (PI) श्री. नितीन उनवणे साहेब यांनी राहत्या घरी भेट दिली.

माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण. आमच्या "महाराष्ट्राची हास्यजत्रा" या कार्यक्रमाचे खूप मोठे चाहते.

सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने हा प्रचंड चर्चेत आहे. निखिलने हास्यजत्रेत सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका केल्या.

पण अवघ्या काहीच दिवसांमध्ये तो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या हास्यजत्रेतल्या लेखक - दिग्दर्शकांनी निखिल बनेला मुख्य कलाकारांच्या यादीत मानाचे स्थान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT