Bharat Jadhav  esakal
मनोरंजन

Bharat Jadhav : 'राजकारण्यांना लाज वाटायला हवी!' भरत जाधव का संतापला?

सकाळच्या सेलिब्रेटी कट्टावर भरत जाधवनं मुलाखतीतून नाट्यगृहं, त्यांची दुरावस्था आणि त्यात सरकारची भूमिका याविषयी सडेतोडपणे भाष्य केले आहे.

युगंधर ताजणे

Bharat Jadhav Actor Exclusive Interview Marathi Theatre : मराठी नाटकांना प्रेक्षकवर्ग आहे. कोरोनानंतर नाट्यगृहांकडे गर्दी वाढली. मराठी चित्रपट आवडीनं प्रेक्षक पाहायला जात आहे. यासगळ्यात प्रेक्षक अधिक सजग झाला आहे. त्याला ज्या गोष्टी खटकतात त्याविषयी तो सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला आहे. मात्र नाट्यगृहांची दुरावस्था आणि त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या भरत जाधवनं परखडपणे मांडलेली भूमिका आता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सकाळच्या सेलिब्रेटी कट्टा वर भरत जाधवनं मुलाखतीतून नाट्यगृहं, त्यांची दुरावस्था आणि त्यात सरकारची भूमिका याविषयी सडेतोडपणे भाष्य केले आहे. याशिवाय त्यानं मराठी चित्रपटांना स्क्रिन्स का मिळत नाही यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अजुनही सही रे सही, तू तू मी मी सारखी नाटकं प्रेक्षकांना आवडत आहे. दशकभरापूर्वीच्या नाटकांना प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर भरत जाधवनं सध्याची नाटकं, त्याचे लेखन, त्याची संहिता यावरही भाष्य केले आहे. नजीकच्या काळात नवोदित नाट्यलेखकांना अधिक दर्जेदार लेखन करावे लागणार आहे. आपण काय कंटेट देतो हेही महत्वाचे आहे. असे भरतनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

नाट्यगृहांची होणारी दुरावस्था आणि सोशल मीडियावर याबाबत होणारी चर्चा आम्हा कलाकारांपर्यत पोहचते. मात्र प्रत्येकवेळी कलाकारांनी काय करायचे यात प्रेक्षकांची भूमिका देखील महत्वाची आहे असे भरत जाधवनं म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित आहेत पण त्यावर कुणीच काही करत नाही. याविषयी कुणालाच काही वाटत नाही. अशीही खंत अभिनेत्यानं यावेळी व्यक्त केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Rana Jagjit Singh Patil : भाजपाचे आमदार राणा पाटील यांचे विद्यमान आमदार व खासदार यांना शह देण्यासाठी परंडा मतदारसंघात दौरे

Ruturaj Gaikwad ने सूर मारला अन् जमिनीलगत अफलातून कॅच घेतला, विदर्भाचा डावही संपवला; पाहा Video

SCROLL FOR NEXT