Akanksha Dubey Suicide Case update Esakal
मनोरंजन

Akanksha Dubey Suicide:'रियल लाईफमध्ये माझ्यासोबत नाही तर..', आकांक्षा दुबे केसमध्ये आरोपी समर सिंगचा खळबळजनक दावा

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर आरोपी समर सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर अनेक खुलासे होताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Akanksha Dubey Suicide: भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे केसला एक नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी ७ एप्रिल रोजी गायक आणि आकांक्षाचा बॉयफ्रेंड समर सिंगला गाझियाबादहून ताब्यात घेतलं आहे. आता आरोपी समर सिंगसोबतच्या चौकशी दरम्यान काही नव्या गोष्टींचा खुलासा झाला आहे.

त्यानं सांगितलं आहे की २५ मार्च च्या संध्याकाळी आकांक्षा दुबेनं त्याला शेवटचा कॉल केला होता. बोलताना फोनमध्ये सतत व्यत्यय येत असल्यामुळे तिनं समोरुन पाच-सहा सेंकदातच फोन कट केला होता.

दोघांमध्ये संबंध बिघडले होते..त्यांच्यात जास्त बोलणं-चालणं नव्हतं. फक्त कामानिमित्तानं बोलणं व्हायचं. (Bhojpuri Actress AKanksha Dubey last call on her death singer samar singh says shs was in contact with two other persons)

समर सिंग उर्फ समरजीत सिंगनं पोलिसांना सांगितलं की आकांक्षा आणि त्याच्यातील अफेअरच्या बातम्या या अफवा आहेत. फक्त कॅमेऱ्यासमोरच त्यांच्यातील रोमान्स हा खरा, बाकी सगळं खोटं आहे. रियल लाइफ मध्ये त्यांच्यात तसं काहीच नव्हतं.

समर सिंगनं आकांक्षाच्या रिअल लाईफमधील दोन मुलांचा उल्लेख केला आहे. तो म्हणाला की आकांक्षा दुबे बनारस आणि मुंबई अशा ठिकाणच्या दोन मुलांच्या खूप जवळ होती.तिघांचे रोज बोलणे-चालणे व्हायचे.

समरनं दावा केला आहे की जर पोलिसांनी आकांक्षाचा फोन चेक केला तर कॉल डिटेल्समधून सगळं काही समोर येईल.

समर सिंग गाझियाबादच्या राजनगर एक्सटेन्शन येथील एका सोसायटीत राहत होता. तिथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या कस्टडीत असलेला समर सिंग फक्त पाणी पित आहे,कारण जेव्हा जेव्हा त्याला जेवणासाठी विचारलं जात आहे तेव्हा तो नकार देत आहे. बनारस पोहोचेपर्यंत समीर सारखा बडबडत होता की मला उगाचच बळीचा बकरा बनवलं जात आहे.

त्यानं पोलिसांना सांगितलं की आर्थिक व्यवहाराची सगळी आकांक्षाची कामं संजय सिंग पाहत होता. तसंच,प्रमोशनचं कामही तो पहायचा. त्याचं ऑफिस मुंबई आणि लखनौमध्ये आहे. पण आपण या दोन्ही शहरांपासून लांब राहिलो कारण माहित होतं की पोलिस आपल्याला शोधत तिकडे नक्की येतील.

माहितीसाठी इथं सांगतो की २६ मार्च रोजी दुपारी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी समर सिंगवर तिला धमकावण्याच्या आणि तिचे पैसे लुबाडण्याचा आरोप केला होता.

पोलिसांना समरनं हे देखील सांगितलं आहे की २७ मार्चला त्यानं फोन बंद केला होता आणि इमरजन्सी व्हॉट्सअप कॉलवरच तो फक्त बोलत होता. समर सिंग विरोधात आकांक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची केस दाखल केली आहे.त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पोलिस कस्टडी मागितली जाईल. समर सिंगची अजून बरीच चौकशी करणं बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT