Bhool Bhulaiyaa 3 teaser  Instagram
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: रुह बाबा बनून परत येतोय कार्तिक..म्हणाला,'यावेळी आत्म्यांशी फक्त बोलणारच नाही तर..'

कार्तिक आर्यननं भूलभूलैय्या ३ चा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिखही जाहीर केली आहे.

प्रणाली मोरे

Bhool Bhulaiyaa 3 ...होय लवकरच सिनेमाचा तिसरा भाग भेटीस येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट्समधून याचा दावा केला जात होता. पण आता कार्तिक आर्यननं सोशल मीडियावर भूलभूलैय्या ३ चा टीझर रिलीज करुन या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

'भूलभूलैय्या २' प्रमाणे 'भूलभूलैय्या ३' चं दिग्दर्शनही अनीस बज्मीचंकरणार आहेत. तर मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यनच दिसणार आहे.(Bhool Bhulaiyaa 3 Teaser Release, kartik Aaryan Announce release date)

कार्तिक आर्यननं शेअर केलेल्या टीझरची सुरुवात एका हवेलीपासनं होते. जसाजसा टीझर पुढे सरकतो तसं पाठनं रूह बाबा बनलेल्या कार्तिक आर्यनचा आवाज ऐकू येतो.

रुह बाबा म्हणतो,'' काय वाटलं? कहाणी संपली? दरवाजे बंदच अशासाठी होतात की एकदिवस पुन्हा त्या दरवाजांना आपण खोलावं''.

आणि यानंतर सिनेमातलं गाणं 'आमी जे तोमार' वाजायला लागतं आणि रुह बाबाची झलक पहायला मिळते.

रुह बाबा म्हणतात,'' यावेळी मी आत्म्यांशी फक्त बोलणार नाही..तर आत्मा माझ्या शरीरातही प्रवेश करतील''.

कार्तिक आर्यननं टीझरला रिलीज करत लिहिलं की,''रूह बाबा रिटर्न्स दिवाली २०२४. म्हणजे हा हॉरर कॉमेडी सिनेमा दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे''.

जेव्हापासून कार्तिक आर्यननं 'भूलभूलैय्या ३' ची घोषणा केली आहे तेव्हापासून चाहते भरभरुन त्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

एका कार्तिकच्या चाहत्यानं लिहिलं आहे की,'' हे देवा..यानं माझा दिवस बनवला'. अखेर यानं 'भूलभूलैय्या ३' ची घोषणा केलीच''.

तर आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे की,''सर.. पुढील वर्षी दिवाळी आम्ही रूह बाबा सोबत साजरी करणार तर''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

SCROLL FOR NEXT