amitabh bacchan 
मनोरंजन

सोनू सूदपाठोपाठ 'बिग बी' यांनीही पुढे केला परप्रांतीयांसाठी मदतीचा हात

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन असताना बॉलिवू मधील बरेच कलाकार या काळात गरिबांच्या मदितीसाठी पुढे आले. अभिनेता सोनू सूदने परप्रांतीय मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी पोहवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतली आहे. नुकताच सोनूने एक हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवासी मजुर त्याला संपर्क करू शकतील आणि ते त्यांच्या घरी पोहचू शकतील. या कठीण काळात अशाप्रकारची मदत केल्याने देशभरात त्याचे फार कौतुक केले जात आहे. आता सोनूनंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील परप्रांतीयांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. बिग बींनी देखील त्याच्या ऑफिस कर्मचाऱ्यांना प्रवासी मजुरांना मदत करण्यास सांगितले आहे. बिग बींनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राज्यात बसेस पाठवण्यास सुरवात केली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मजुर त्यांच्या घरी जाऊ शकतील. सध्यातरी या बसेस उत्तरप्रदेशासाठी पाठवल्या जाणार आहेत. 

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार बिग बींच्या ऑफिसमधून दहाहून अधिक बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बसेस गुरुवारी (ता.२८) मुंबई येथील हाजीअली परिसरातून सोडल्या जाणार आहेत. या सगळ्या बसेस उत्तरप्रदेश येथे राहणाऱ्या सर्व मजुरांना त्यांच्या घरी सोडून पुन्हा येणार आहेत.  बिग बींचे ऑफिस गेल्या दोन महिन्यांपासून मदतीचे कार्य करत आहेत. या मजुरांना त्यांच्या घरी पोचवण्याची मदत करण्याआधी बिग बींनी हजारो कुटुंबांसाठी आणि मजुरांसाठी रेशन दान केले होते. याशिवाय रुग्णालय आणि पोलिसांना पीपीई किट्सची मदत देखील त्यांनी केली आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचे एमडी राजेश यादव ही मदत गरिबांपर्यंत पोहचवत आहेत. राजेश हे रोज 4500 पेक्षा जास्त फूड पाकीट हाजीअली दर्गा, धारावी, माहीम दर्गा, जुहू आणि इतर ठिकाणी पोहचवत आहेत. या पॅकेट्समध्ये कुटुंबांना महिनाभर पुरेल इतकं अन्न आहे. बिग बींची टीम फक्त अन्न धान्य नाही तर इतर वस्तू देखील गरिबांना पोहचवत आहेत. मुंबई शहरसोडून त्यांच्या घरी चाललेल्या मजुरांना त्यांनी 9 मे पासून आतापर्यंत 2000 ड्रायफ्रूट पॅकेट्स, 2000 पाण्याच्या बॉटल, आणि 1200 चप्पल यांची देखील मदत करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

'माझी वडिलांशी तुलना करू नका' लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलताना अभिनय म्हणाला... 'त्याची उणीव...'

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Navi Mumbai: नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा सुरू होणार; कधीपासून अन् तिकीट दर काय असणार? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT