sneha wagh and aavishkar  
मनोरंजन

"जो स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार?"; स्नेहाचा आविष्कारला टोला

आविष्कार तिला काय उत्तर देणार हे पुढील भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी ३ चा दुसरा आठवडा सुरू झाला आणि सुरू होताच बिग बॉसने सदस्यांनावर 'हल्ला बोल' हे कार्य सोपावलं. या टास्कमध्ये दोन टीम करण्यात आले आहेत. मंगळवारच्या एपिसोडमध्ये मोटर बाईकवर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या होत्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. बऱ्याच चर्चांनंतर सोनाली आणि सुरेखा ताईंसोबत टास्कला सुरुवात झाली होती. त्यानंतर विकास आणि विशाल हे मोटर बाईकवर बसायला आले. हा टास्क बुधवारच्या भागातही पहायला मिळणार आहे. विकास आणि विशाल मोटर बाईकवर किती वेळ बसू शकतील हे पुढच्या भागात पहायला मिळेल. त्याचप्रमाणे टास्क जिंकण्यासाठी सदस्य कोणकोणते फंडे वापरणार, याचीसुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

'हल्ला बोल' टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे सदस्य आटोकाठ प्रयत्न करत आहेत. टास्कदरम्यान आविष्कार हा विकास आणि विशाल यांना धीर देताना दिसणार आहे. "मी खेळायला तयार आहे, पण आता तुम्हाला खेळायचं आहे", असं तो विकास आणि विशालला म्हणतो. त्यावर आविष्कारला स्नेहा टोला लगावते. "जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार", अशा शब्दांत स्नेहा आविष्कारला सुनावते. आता यावर आविष्कार तिला काय उत्तर देणार, या दोघांमध्ये बिग बॉसच्या घरात वाद होणार का हे पुढील भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

आविष्कार हा स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती आहे. वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. स्नेहाने आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. "मी खूप वेदना सहन केल्या आहेत. पतीच्या मारहाणीला बळी पडणाऱ्या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं", असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT