Bigg Boss Marathi 4 Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसचा विनर आला समोर; मांजरेकरांनीच दिली हिंट

Vaishali Patil

बिग बॉस ४ च्या पर्वाचा आज शेवटचा दिवस आहे. सगळ्याचं सध्यांकाळची उत्सूकता लागलेली आहे. कारण ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत तो क्षण आता अगदीच जवळ आला आहे. गेली 99 दिवस आपण बिग बॉस मराठीचा खेळ पाहत आहोत.

अवघ्या काही तासातच या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. त्या क्षणाची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाणार आहे.

बिग बॉसच्या चौथ्या सिझनचा विजेता कोण असणार याबद्द्ल तर्क वितर्क लावले जात असतांनाच खुद्द शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी आता विनर कोण असणार याबद्दल मोठी हिंट दिली आहे.

आता घरात आहेत टॉप ५.अमृता धोंगडे,किरण माने,अक्षय केळकर,अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंत. शोच्या फिनालेचा प्रोमो समोर आला आहे. यात स्पर्धक आपल्या नृत्यांने सोहळ्यात रंगत आणतांना दिसताय.

त्यात महेश मांजरेकर म्हणताय की मित्रानो १०० दिवसांची चटरफटर आज संपणार आहे आणि अवघ्या काही तासातच या सिझनचा विनर आपल्याला मिळणार आहे. या सिझनचा विनर मिळणार असं म्हणताच अपुर्वा नेमळेकर आपल्याला समोर दिसतेय. त्यामुळे आता या सिझनची विनर अपूर्वा नेमळेकर असेल असा अंदाज चाहते लावतं आहेत.

बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले मिळवून अपूर्वा थेट टॉप फाइव्ह मध्ये गेली. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. तसेच तिची चाहता वर्गही मोठा आहे त्यामुळे तिच्या जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ministers: मंत्री घेणार आलिशान गाड्या; राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांसाठी तर मर्यादाच नाही, किती पैसे मंजूर?

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Nashik News : नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी भगूरमधील रस्त्यांची दुरवस्था; भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार

Chakur News : सहकारमत्र्यांकडून कृषी कार्यालयाचा पंचनामा; कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर

Nashik Railway Station : नाशिक रेल्वे स्थानक कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार; रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT