bigg boss marathi season 4 coming soon.. sakal
मनोरंजन

राडा, लफडी आणि चिक्कार मनोरंजन घेऊन 'बिग बॉस मराठी' पुन्हा येतंय..

'बिग बॉस मराठी'चे तिसरे पर्व काही महिन्यांपूर्वीच संपले. प्रेक्षक आता नव्या पर्वाची वाट पाहत असून लवकरच चौथे पर्व येणार आहे.

नीलेश अडसूळ

Bigg Boss : मराठी मालिका विश्वात 'बिग बॉस' ही संकल्पना रुजेल का याबाबत अनेकांना शंका होती. पण काही वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीत सुरु झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. दैनंदिन मालिकांमधील काल्पनिक कुरघोड्या पाहण्यापेक्षा एका घरात बंद असलेल्या लोकांमध्ये घडणाऱ्या खऱ्या कुरघोड्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या. बघता बघता या मालिकेचे तीन सीजन झालेही आणि आता चौथा सीजन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (bigg boss marathi season 4)

विविध माध्यमातील कलाकार, काही प्रसिद्ध तर काही नवोदित चेहरे यांना एकत्र करून तब्बल १०० दिवस एका घरात एकत्र ठेवले जाते. या शंभर दिवसांच्या खेळात त्या कलाकारांचे खरे चेहरे लोकांसमोर येतात. प्रेम, भांडणं, जिव्हाळा, कुरघोड्या असं मनोरंजनाचं मोठं पॅकेज या कार्क्रमात असतं. पहिल्या पर्वात मेघा धाडेने बाजी मारली, दुसरे पर्व शिव ठाकरे जिंकला तर तिसऱ्या पर्वावर विशाल निकम याने आपले नाव कोरले. या तीनही पर्वाने प्रेक्षकांना पुरते वेडे केले. त्यामुळे चौथे पर्व कधी येणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे

एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठीचे (bigg boss marathi) चौथे पर्व लवकरच येणार आहे. हा चौथा सीझन १० जुलैनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल तर जून महिन्यात या सीझनचे प्रोमो बाहेर येतील. गेल्या काही पर्वाच्या आखणीवरुन हा अंदाज बांधण्यात आल्याचे समजते. शिवाय करोना स्थितीही आटोक्यात असल्याने वाहिनीकडूनही (colors marathi) चौथ्या सीजनबाबत सकारात्मकता आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न चाहत्यांना आहे. याबाबत अद्याप खुलासा झाला नसला तरी महेश मांजरेकरच (mahesh manjrekar) हेही पर्व होस्ट करतील असे दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri 2159 Crore Investment : महाराष्ट्रात 82,655 कोटींची विक्रमी गुंतवणूक; 1.55 लाख तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Mumbai MHADA: मुंबईत म्हाडाच्या सात मजली इमारतीचा प्लास्टर कोसळला; १७ वर्षीय मुलीसह तिघे जखमी

Mhada: उमरखाडीचा समूह पुनर्विकास, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Marathi News Live Updates : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा निशाणा; RSS च्या भूमिकेवर केले गंभीर आरोप

झी मराठीवर स्टार प्रवाहच्या हिरोची एन्ट्री; ‘धाकट्या सूनबाई’साठी 'या' अभिनेत्याचं नाव पक्कं?

SCROLL FOR NEXT