Puneet Superstar  bigg boss ott Salman Khan
Bigg Boss OTT 2 Puneet Superstar to re-enter Salman Khan show during Weekend Ka War?
Puneet Superstar bigg boss ott Salman Khan Bigg Boss OTT 2 Puneet Superstar to re-enter Salman Khan show during Weekend Ka War? Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT: पहिल्याच दिवशी घराबाहेर काढलेला पुनित करणार पुन्हा एंट्री? सलमान टोचणार कान...

Vaishali Patil

 puneet superstar to re-enter: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या सुरु आहे. आता या सिझनमध्ये देखील अनेक वादविवाद आणि तुफान राडे पहायला मिळत आहे. त्यातच आता या सिझनचा 'वीकेंड का वार' आता सुरु होणार आहे. हा सिझन सुरु होताच वादातही सापडला आणि लोकप्रिय देखील झाला.

या शोचा पहिला दिवस चर्चेत आला तो पुनीत सुपरस्टार या स्पर्धकांमुळे. त्याने घरात एंट्री करताच इतका धुमाकूळ घातला की त्याला घरातुन हाकलण्यात आलं.

पुनीत सुपरस्टारला 'बिग बॉस'मधून बाहेर काढण्यात आले कारण तो घरातील मालमत्तेचे नुकसान करत होता. बिग बॉसने घरातील सदस्यांच्या मतदान केल्यानंतर त्याला बाहेर हाकललं.

मात्र त्याला घरातुन बाहेर काढल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि कमेंट्स करण्यात आल्या ज्यात पुनीतच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

बिग बॉसच्या या निर्णयाने पुनितचे चाहते खुप संतापले आहेत. पुनितनेही सोशल मिडियावर व्हिडिओ शेयर करत शो च्या निर्मात्यांवर आणि घरतील सदस्यांवर देखील टिका केली.

पुनितचे चाहते हे सलमान खान आणि निर्मात्यांना पुनितला पुन्हा शोमध्ये घेण्यात यावे अशी मागणी केली. आता मिडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, पुनीत सुपरस्टार पुन्हा घरात प्रवेश केला आहे.तो वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करू शकतो.

आज शनिवारच्या रात्री शोचा पहिला 'वीकेंड का वार' होणार आहे. 'बिग बॉस'शी संबंधित देत राहणाऱ्या 'द खबरी'ने या शोमध्ये पुनीत सुपरस्टार पुन्हा येणार असल्याच ट्विट केले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.

त्याचबरोबर टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानंतर पुनीत वाइल्ड कार्ड एंट्री मधुन शोमध्ये परत येऊ शकतो. कारण तो घरी नाही तर त्याच्या फॅन क्लबने सांगितले आहे की तो सध्या हॉटेलच्या खोलीत राहत आहे. त्यामुळे आता तो पुन्हा घरात एंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT