mulayam singh yadav 
मनोरंजन

मुलायमसिंह यादव यांचाही बायोपिक लवकरच भेटीला; चित्रपटाचा ट्रेलर झाला लॉन्च

संतोष भिंगार्डे

मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिकची मोठी क्रेझ आली आहे. अनेक व्यक्तींवर चरित्रपट बघायला मिळत आहे. विशेषतः क्रीडा आणि राजकारणातील व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत असल्याचे आपल्याला दिसून आले. त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यातूनच आता देशातील आणखी एका राजकारणी व्यक्तीवर बायोपिक येत आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. त्याचे नाव आहे 'मै मुलायम सिंह यादव'. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. ट्रेलरमध्ये मुलायम सिंह यांच्या राजकीय नाट्याची झलक पाहायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सुवेंदू राज घोष करीत आहे तर अमित सेठी हा कलाकार मुलायम सिंह यांची भूमिका साकारीत आहे. 

एक शेतकरी मुलगा, एक कुस्तीपटू ते नावाजलेले राजकारणी असा एकूणच मुलायम सिंह यांचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या जीवनातील अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. 

या चित्रपटात मिमोह चक्रवर्ती, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, सुप्रिया कर्णिक, सयाजी शिंदे, सना अमीन शेख,  जरीना वहाब आणि प्रकाश बेलावाडी यांच्याही महत्त्वपूर्ण प्रमुख भूमिका आहेत. एम एस फिल्म्स अँड प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली मीना सेठी मोंडल निर्मित हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होत आहे. 
---
संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

Amravati Social Work : दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रांचे दान नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांची अनोखी माणुसकी

व्हायरल होण्यासाठी काहीही? भारती सिंग सांगितल्या विनोदाच्या मर्यादा, म्हणाली...‘माझी आईसुद्धा पाहणार...’

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Petrol-Diesel: कच्चे तेल महागल्याने पाकिस्तानात 'लॉकडाऊन'चा विचार! भारतात पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर काय?

SCROLL FOR NEXT