rana jung bahadur news  esakal
मनोरंजन

Rana Jung Bahadur: वाल्मिकींबद्दल काढले अपशब्द! प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या कारणामुळे वाद होताना दिसत आहे. एकीकडे आपल्या माहितीपटामुळे दिग्दर्शक लीना मणिमेकलई या चर्चेत आल्या आहेत.

युगंधर ताजणे

Rana Jung Bahadur: सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या कारणामुळे वाद होताना दिसत आहे. एकीकडे आपल्या माहितीपटामुळे दिग्दर्शक लीना मणिमेकलई या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी हिंदू देवदेवतांना धुम्रपान करताना (social media viral news) दाखवल्यानं त्यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. दुसरीकडे प्रसिद्ध एका पंजाबी अभिनेत्याला भगवान वाल्मिकी यांच्याबद्दल ( Rana Jung Bahadur news viral) टिप्पणी करणं महागात पडलं आहे. त्या अभिनेत्याला पोलिसांनी अटकही केली आहे. पंजाबी आणि हिंदी चित्रपटांतून नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अभिनेत्याचे नाव आहे राणा जुग बहादुर.

जालंदरमधील पोलिसांनी राणा बहादुर यांना अटक केली आहे. त्यांनी एका टीव्ही (social media post news) चॅनेलवरील मुलाखतीमध्ये वाल्मिकी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे संतापलेल्या भक्तांनी आणि त्या संबंधित समाजातील व्यक्तींनी राणा यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात वेगळा संदेश जात असून अशाप्रकारच्या वक्तव्यानं समाजातील शांततेचा भंग होत असल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अकाली दलचे नेते चंदन ग्रेवाल यांनी पोलीस अधिकारी गुरशरण सिंग संधु यांची भेट घेऊन राणा बहादुर यांना अटक करण्याची मागणी केली होती. याशिवाय वाल्मिकी संघटनांनी आक्रमक होत राणा यांच्याविरोधात निदर्शनं केल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर देखील राणा यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्यांनी वाल्मिकी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं सामाजिक शांततेचा भंग झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही यावेळी करण्यात आले. वास्तविक हे प्रकरण गेल्या महिन्यातील असून सोशल मीडियावर सुरु झालेल्या वादानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे. नेटकऱ्यांचा वाढता रोष आणि राणा यांच्यावर होणारी टीका लक्षात घेऊन त्यांना जालंधर पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : 'मत चोरी'सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी विधाने करू नका; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला

Latest Marathi News Updates : २५ ऑगस्टला वनतारा माधुरी हत्तीणी प्रकरणाची पुढील सुनावणी होणार

IPL 2026: डेवॉल्ड ब्रेव्हिससाठी CSK ने अंडर द टेबल बरीच रक्कम दिली; आर अश्विनच्या दाव्याने खळबळ, फ्रँचायझीचा सौदा संशयाच्या भोवऱ्यात

Janmashtami Travel Tips: जन्माष्टमीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'या' हिल स्टेशनची सैर, मिळेल आनंद

Karad Crime: वाखाण भागात घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास, शहर पोलिसात फिर्याद दाखल

SCROLL FOR NEXT