Shahid-Kapoor 
मनोरंजन

क्रिकेट खेळताना 'कबीर सिंग' जखमी; पडले 13 टाके!

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही वर्षांपासून खेळांवर आधारित चित्रपट येत आहेत. आतापर्यंत क्रिकेट, हॉकी, बॉक्सिंग आणि फुटबॉलवरील चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये क्रिकेटवरील चित्रपटांची संख्या जास्त आहे. 

लगान, इक्बाल, फेरारी की सवारी, चैन कुली की मैन कुली या चित्रपटांप्रमाणे सचिन, धोनी- द अनटोल्ड स्टोरी, अजहर यांसारखे चरित्रपटही आले. सध्या भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्यावर आधारित 83 हा चित्रपट अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे. याची चर्चाही प्रचंड सुरू आहे. त्यानंतर क्रिकेटवर आधारित 'जर्सी' हा आणखी एक सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याच्या चित्रीकरण जोरात सुरू आहे. 

बॉलिवूडचा 'कबीर सिंग' अभिनेता शाहिद कपूर 'जर्सी'मध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारत आहे. शाहिदने या सिनेमासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 35 कोटी रुपये मानधन घेतले असल्याबाबतची चर्चा मध्यंतरी माध्यमांत सुरू होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा उंचावल्या होत्या. मात्र, शाहिदच्या चाहत्यांसाठी थोडी वाईट बातमी आहे. कारण चंदिगड येथे शूटिंग सुरू असताना शाहिद जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

पिंकव्हिला या बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.11) सायंकाळपर्यंत चित्रपटाच्या सेटवर शूटिंग सुरू होते. त्यानंतर एका शॉटच्या दरम्यान शाहिद जखमी झाला. यावेळी शाहिदच्या डोक्याला चेंडू लागल्याने तो जखमी झाला असून त्याला 13 टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झाल्यानंतर त्याला लगेच तेथील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. 

आता शाहिदची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शाहिद पूर्णपणे ठीक होईपर्यंत चित्रपटाचे शूटिंग होणार नसल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले. शाहिद जखमी झाल्याने त्याची पत्नी मिरा राजपूत-कपूरने चंदिगड गाठले आहे.

गौथम तिन्नानूरी यांनी 'जर्सी'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. जर्सी हा तेलुगू चित्रपटाचा रिमेक असून त्याचे दिग्दर्शनही गौथम यांनीच केले होते. यावर्षीच 28 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st Test: 'आम्हाला हवी होती, तशीच खेळपट्टी, पण...', पराभवानंतरही गौतम गंभीरने टीका करणाऱ्यांना सुनावलं

Latest Marathi Breaking News Live : अलिबागची मांडवा जेट्टी धोकादायक! पायाभूत रचना कमकुवत, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण' योजनेचे पैसे थांबू नयेत म्हणून १८ नोव्हेंबरची डेडलाईन; ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'उसाला पहिल्यांदाच ३५०० पहिला हप्ता'; काेणत्या कारखान्यांनी दर केले जाहीर?

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’ पाडकामात हादऱ्यांची तीव्रता मोजणार, एमएमआरडीएकडून व्हीजेटीआयची नियुक्ती

SCROLL FOR NEXT