Alia bhatt esakal
मनोरंजन

Brahmastra First Look: जन्मदिनाच्या दिवशी चाहत्यांची ईशाशी भेट

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया आज 29 वर्षांची झाली (Alia Bhatt) आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Movies: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया आज 29 वर्षांची झाली (Alia Bhatt) आहे. त्यानिमित्तानं तिनं एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिच्या आगामी ब्रम्हास्त्र (brahmastra) नावाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक (First Look viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रणबीर कपूर आणि (Entertainment news) आलियाच्या या मोठ्या प्रोजेक्टची चर्चा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे हा चित्रपट प्रदर्शनापासून लांब होता. अखेर तो आता प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. रणबीर आणि आलिया बऱ्याच काळानंतर या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. पुढच्या आठवड्यात आलियाचा आरआरआर हा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एस एस राजमौली यांनी आरआरआर चे दिग्दर्शन केले आहे. मात्र सध्या चर्चा आलियाच्या ब्रम्हास्त्रची आहे. त्यामध्ये आलियाचा हटके लूक पाहून नेटकऱ्यांनी आलियावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. 31 सेकंदाच्या त्या ट्रेलरमध्ये आलियाचे वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहे. त्यातून तिनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी आलियाचा तिच्या अनेक चित्रपटांमधून वेगवेगळे लूक व्हायरल झाले आहेत. त्यात आता तिच्या ब्रम्हास्त्रच्या लूकची चर्चा आहे. या लूकमध्ये रणबीरही दिसत आहे. आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र हा येत्या सप्टेंबरच्या 22 तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हा व्हिडिओ शेयर करताना अयाननं लिहिलं आहे की, आलिया तुला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुझ्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो आहे. त्याचे सारे श्रेय तुला द्यावे लागेल. आज तुझा दिवस आणखी संस्मरणीय व्हावा यासाठी आम्ही ब्रम्हास्त्रचा फर्स्ट लूक व्हायरल केला आहे. त्याला नेहमीप्रमाणे तुझ्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुझ्या आगामी प्रोजेक्टसाठीही तुझी प्रशंसा केली आहे. हे सगळं काही कौतूकास्पद आहे. आता आपल्या सगळ्यांना ब्रम्हास्त्रची उत्सुकता आहे. आलियानं देखील इंस्टावरुन व्हिडिओ शेयर करुन लिहिलं आहे की, आज जन्मदिवस. ईशाची भेट घेण्यासाठी आजचा दिवस निवडला. यापेक्षा आणखी कोणती आनंदाची बाब असू शकते. आलियानं यासाठी अयानला धन्यवाद दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

SCROLL FOR NEXT