Aashiqui actress anu agrawal  
मनोरंजन

'आशिकी' मधली अनु आहे कुठे?

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (Bollywood Director Mahesh Bhatt) यांचा सुपरहिट चित्रपट आशिकी (Aashiqui) अनेकांना माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (Bollywood Director Mahesh Bhatt) यांचा सुपरहिट चित्रपट आशिकी (Aashiqui) अनेकांना माहिती आहे. 90 च्या दशकांत या चित्रपटानं चाहत्यांच्या मनावर गारुड केलं होतं. या चित्रपटातील गाण्यांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. समीर (Sameer) यांनी लिहिलेल्या गीतांना नदीम श्रवण यांनी स्वरसाज दिला होता. त्या गाण्यांना आजची तरुणाई वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सादर करत असते. या चित्रपटामध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या (Rahul Roy And Anu Agrawal) दोन कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आशिकीनंतर अनु तर बॉलीवूडपासून लांबच गेली. आज तिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्या बॉलीवूड प्रवासाला दिलेला हा उजाळा.

11 जानेवारी 1969 मध्ये अनु अग्रवालचा (Anu Agrawal) जन्म झाला. आशिकीनंतर तिच्या वाट्याला अमाप यश आलं. मात्र ते तिला टिकवता आलं नाही. कारण त्यानंतर तिच्या वाटयाला फारसे चित्रपट आलेच नाहीत. ती सतत वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. तिचं दिसणं, सोशल मीडियावर सक्रिय असणं हे तिच्यासाठी ट्रोलिंगचं कारण ठरु लागलं. आता अनु बॉलीवूडच्या झगमगाटापासून लांब आहे. ती सध्या काय काम करते, ती कुठे आहे याविषयी चाहत्यांना काहीच माहिती नाही. दिल्लीमध्ये आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनुला आशिकीतून बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला होता.

वयाच्या 21 व्या वर्षी तिनं आशिकीमध्ये काम केलं. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. त्यानंतर तिनं गजब तमाशा, खलनायिका, किंग अंकल, कन्यादान, सारख्या काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं. मात्र त्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 1999 मध्ये झालेल्या एका अपघातामध्ये अनुची स्मरणशक्ती गेली. त्यानंतर तिला मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर अनुनं आपली सगळी संपत्ती दान केली. आणि ती योगा शिक्षक झाली. आता ती बिहारमध्ये जाऊन तिथल्या मुलांना योगाचे धडे देत आहे. अनुनं आपल्या आत्मचरित्रामध्ये अनेक गोष्टींविषयी खुलासे केले आहेत. तिचं 'अनयूझुअल: मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT