Madhuri Dixit  esakal
मनोरंजन

त्यात काय एवढं!, माधुरी दीक्षितही राहते भाड्याच्या घरात, महिन्याला ती भरते...

माधुरी दीक्षितच्या घराचं भाडं माहितीये? आकडा ऐकून चक्कर

युगंधर ताजणे

Bollywood Actress: बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. तिचं सौंदर्य, डान्स, अभिनय याविषयी तासनतास बोलणाऱ्या चाहत्यांची संख्या काही (Entertainment News) कमी नाही. सध्या ती तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. पहिल्यांदाच माधुरी वेब सीरिजच्या प्लॅटफॉर्ममध्ये कमबॅक करते आहे. तिच्या (Web Serise) फेम गेम नावाच्या मालिकेची जोरदार (The Fame Game) चर्चाही आहे. ती त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी माधुरीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच माधुरीही एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते असे चाहत्यांना कळाल्यावर त्यांना तर धक्काच बसला. मात्र माधुरीच्या फ्लॅटचं भाडं ऐकून तिला ट्रोल करणाऱ्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.

माधुरी आणि डॉ.श्रीराम नेने यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी भागामध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला. हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही महिन्याला त्या फ्लॅटचे साडेबारा लाख रुपये भाडे भरत असल्याचे दिसून आले आहे. पिंकव्हिलाला अपूर्वा श्रॉफनं दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. तिनं त्या घराचं इंटेरियर डेकोरेशन केलं आहे. तिनं सांगितलं की, 29 व्या मजल्यावर माधुरीचा फ्लॅट आहे. तो ही मुंबईतील वरळी सी फेज भागात. त्यामुळे त्याची किंमत आणि भाडं हे जास्तच असणार याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या घरामध्ये आकर्षक सजावट, लक्षवेधी रंगयोजना, यांचा विचार केला आहे. ते घर जास्तीत जास्त सुशोभित करण्याचा प्रयत्नही केला आहे.

आयशानं त्या घराचे काही फोटो तिच्या इंस्टावरुन शेयर देखील केले आहेत. त्यात तिनं पूर्वीचा तो फ्लॅट आणि सजावट केल्यानंतर त्याचं दिसणार रुप हे दोन्ही फोटो शेयर केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी त्या फोटोवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यावेळी आयशानं माधुरीचं घर मला सजवायला मिळणं म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. दीड महिन्यांमध्ये आपण हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे आयशानं सांगितलं आहे. माझ्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना हे घर कशापद्धतीनं सजवलं आहे, हे सांगण्याचा मोह मला काही केल्या आवरत नाही. अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माधुरीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास तिनं ओटीटीवरुन मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नेटफ्लिक्सवरुन तिची द फेम गेम नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्यात संजय कपूर, मानव कौल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर बिजॉय नांबियार यांनी त्या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT