Nora fatehi Instagram News
Nora fatehi Instagram News 
मनोरंजन

Nora Fatehi: काय कळेना! नोरा फतेहीचं 'Insta' अकाउंट डिलिट

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखली जाणाऱ्या नोराची (Bollywood Actress Nora Fathehi) डोकेदुखी आता वाढली आहे. त्याचे कारण तिचं इंस्टा अकाउंट डिलिट (Instagram Account Delete) झालं आहे. त्याबाबत तपास सुरु आहे. मात्र त्यामागील नेमकं खरं कारण काय याविषयी चाहत्यांना माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर (Social Media News) सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या नोराचं इंस्टा अकाउंट डिलिट झाल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाखोच्या संख्येनं फॉलोअर्स असणाऱ्या नोराचा केवळ भारतातूनच नाहीतर जगभरातून चाहतावर्ग पसरला आहे. त्यामुळे नोराची क्रेझ ही सातासमुद्रपार गेल्याचे दिसून आले आहे. (Nora Fathehi Instagram Account delete on social media)

इंस्टाच्या माध्यमातून नोरा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले फोटो, व्हिडिओ शेयर करुन ती चाहत्यांच्या चर्चेत असते. तसे करणे तिला आवडते. रियॅलिटी शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या नोरानं इंस्टावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. इंस्टाच्या माध्यमातून नोरा ही चाहत्यांना तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसची माहिती देत असे. आता तिचं अकाउंट डिलिट झाल्यानं तिला मोठा धक्का बसला आहे. (Nora fatehi Instagram News)

सध्या सोशल मीडियावरुन तिचं इंस्टाचं अकाउंट डिलिट झालं आहे. नोराला इंस्टावर तब्बल 37.6 मिलियन युझर्स आहेत. मात्र आता ते नाहीत. देशातल्या टॉपच्या सेलिब्रेटींमध्ये नोराचं नाव घेतलं जातं. तसेच सोशल मीडियामध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही नोराच्या नावाचा समावेश आहे. असं असताना तिचं अकाउंट सोशल मीडियावरुन गायब होणं यामुळे तिच्यासह चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT