Urmila Matondkar  esakal
मनोरंजन

Urmila Wedding Anniversary: काश्मिरी उद्योगपतीसोबत थाटला संसार

बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अभिनयासाठी ओळखल्या जातात.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अभिनयासाठी ओळखल्या जातात. काही त्यांच्या दिसण्यामुळे तर काही नेहमीच (Bollywood News) एखाद्या विषयावर रोखठोक भूमिका घेण्यामुळे. उर्मिला मातोंडकर ही अभिनेत्री तिच्या रोखठोक व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. ती आता शिवसैनिक आहे. तिचा राजकीय क्षेत्रातील प्रवास अनेकांसाठी धक्काच होता. अभिनय क्षेत्र सोडून ती आता राजकीय क्षेत्रामध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहे. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याशी संबंधित अधिक माहिती घेणार आहोत. Bollywood Actress Urmila Matondkar Wedding Anniversary

उर्मिलाच्या लग्नाचा आज सहावा वाढदिवस आहे. तिनं मोहसिन अख्तर सोबत लग्न केले आहे. तो काश्मिरमधील उद्योगपती आहे. तिनं 2016 मध्ये लग्न केलं. बांद्रामधील आपल्या घरीच निवडक पाहुण्यामंडळीच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. उर्मिलानं दोन्ही पद्धतीनं विवाह केला होता. त्यावेळी तिच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. उर्मिला आणि मोहसीनची ओळख प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पुतणीच्या लग्नात झाली होती. त्यांनी अनेक वर्षांपासून आपल्या रिलेशनशिपची माहिती मीडियापासून लपवली होती.

उर्मिलानं तिच्या इंस्टावरुन एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये उर्मिला आणि मोहसीनची जोडी सुंदर दिसते आहे. त्या फोटोमध्ये तिनं व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. फोटोंना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. उर्मिलानं त्या फोटोला एक कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये ती लिहिते, सहा वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले. लग्नानंतर आम्ही खूप प्रवास केला. आशीर्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी गेलो. आताचा जो फोटो आहे तो आम्ही एका ढाब्यावर क्लिक केला होता. त्या जागेच्या काही आठवणी फोटोमध्ये कैद केल्या होत्या. आज त्यांना पुन्हा उजाळा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

लग्नाच्या आमिषाने संबंध, गुण जुळेनात म्हणत नकार दिल्याचा आरोप; सुप्रीम कोर्ट म्हणाले, कुंडली बघून नातं जोडलं पाहिजे

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

UPI Digital Payment : UPI ची वर्ल्डवाइड झेप! मोडले सर्व रेकॉर्ड; एका महिन्यात २७ लाख कोटींचे व्यवहार

SCROLL FOR NEXT