Anurag Kashyap  esakal
मनोरंजन

'आम्ही इतिहासाला तोडून - मोडून दाखवतो, का म्हणतोय अनुराग कश्यप असं?

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे.

युगंधर ताजणे

Bollywood movies: बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. तो नेहमीच त्याच्या परखड़ वक्तव्यासाठी देखील चर्चेत असतो. आता त्यानं सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या निमित्तानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल (Bollywood news) मीडीयावरुन चर्चेत आली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित (The kashmir Files) काश्मीर फाईल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसतो आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काश्मीर फाईल्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काश्मीर फाईल्सवर आतापर्यत राजकीय, सामाजिक, आणि बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. काश्मीरी पंडितांचे विस्थापन, त्यांच्यावर झालेले शाररिक आणि मानसिक अत्याचार या साऱ्या गोष्टींची चर्चा चित्रपटाच्या निमित्तानं करण्यात आली आहे. अनुराग कश्यपनं मात्र हा विषय सोडून टॉलीवूडमधील चित्रपटांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यानं या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर स्तुतीही केली आहे. त्याचं झालं असं अनुरागनं तिरुअनंतपुमरमधील केरळच्या आंतरराष्ट्रीय केरळीयन चित्रपट महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता. त्याच्या उद्धघाटन सोहळ्याप्रसंगी तो हजर होता.

अनुरागनं त्या महोत्सवाच्या माध्यमातून केरळीयन चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर स्तुती केल्याचे दिसून आले आहे. भारतीय सिनेमामध्ये मल्याळम चित्रपटांचे योगदान असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशातील सर्वोत्तम सिनेमा हा देवाच्या गावातूनच येतो. मी हिंदी चित्रपट बनवतो. मात्र याठिकाणी आम्ही इतिहासाला तोडून मोडून टाकतो. दुसरीकडे केरळसारख्या राज्यांत ज्या पद्धतीनं चित्रपट तयार केला जातो तो कौतूकास्पद आहे. त्यांच्या चित्रपटात इतिहास प्रभावीपणे मांडला जातो. हे माझं निरिक्षण आहे. आम्हाला बहुतांशी प्रेरणा या चित्रपटांमुळेच मिळते. अस मतं अनुरागनं यावेळी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT