Meluha News 
मनोरंजन

Shiva Web Series: अमिश त्रिपाठींच्या 'मेलूहा'वर वेबसीरिज

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शन स्टाईलमुळे शेखर कपूर हे नेहमीच चर्चेत राहिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: जगभरामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीनं वाचकांचे लक्ष वेधून घेणारी तीन कादंबऱ्यांची (English Novel) मालिका अमिष त्रिपाठी (amitsh tripathi) यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या मेलुहानं जगभरातील अनेक वाचकांना मोहिनी घातली होती. आता त्या कादंबऱ्यांवर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar kapoor) हे वेबसीरिजची (Web serise) निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शन स्टाईलमुळे शेखर कपूर हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नव्या कलाकृतीबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

अमिश त्रिपाठी यांच्या प्रसिद्ध द इमॉर्टल्स ऑफ मेलूहावर शेखर कपुर हे आंतरराष्ट्रीय वेब सीरिजची निर्मिती करणार आहेत. त्या मालिकेचे नाव शिवा असे असणार आहे. ज्यांनी मेलुहा वाचले असेल त्यांना शिवाचे पराक्रम आणि त्याचे साहस याविषयी माहिती असेलच. वाचकांचा मोठा प्रतिसाद या कलाकृतीला मिळाला होता. लहानांपासून मोठ्या व्यक्तींना देखील या कादंबरीनं भुलावून टाकलं होतं. आता त्यावर मालिका तयार होणार असल्याचे कळताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी अनेक प्रसिद्ध साहित्य कलाकृतींवर वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.

त्यामध्ये विक्रम सेठ यांच्या अ सुटेबल बॉय यावर त्याच नावाची मालिका मीरा नायर यांनी दिग्दर्शित केली आहे. त्यानंतर विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स या कादंबरीवर आधारित त्याच नावाची मालिका अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केली होती. या वेबसीरिज पासून हिंदी वेबसीरिजचा ट्रेंड वाढत गेल्याचे दिसून येईल. त्याच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. शेखर कपूर यांनी जेव्हा अमिषचे मेलुहा वाचले तेव्हा त्यांना असे वाटले की, ही कलाकृती आपल्याला जगभर नेता येईल.

मेलुहावरील मालिकेची निर्मिती ही इंटरनॅशनल आर्ट मशीनच्या वतीनं करण्यात येत आहे. शेखर कपूर यांच्याविषयी आणखी माहिती द्यायची झाल्यास त्यांनी मिस्टर इंडिया आणि बँडिट क्विन सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. केवळ शेखर कपूर नव्हे तर फॅमिली मॅनचे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा आणि शोरनर देखील या मालिकेचे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT