bhuban news esakal
मनोरंजन

'जास्त पैसे मिळाले माझं डोकंच फिरलं', कच्चा बादाम फेम गायकाची कबूली

कच्चा बादाममुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या भुवन (Viral On Social Media) बादायकरनं मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांची पसंती मिळवल्याचे दिसून आले होते.

युगंधर ताजणे

Kacha Badam: कच्चा बादाममुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या भुवन (Viral On Social Media) बादायकरनं मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांची पसंती मिळवल्याचे दिसून आले होते. त्याच्या गावात देखील माध्यमाच्या प्रतिनिधींनी (Tv Entertainment) गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी देशातील सोशल मीडियावर अनेकांच्या तोंडी कच्चा बादामचं (Kacha Badam Viral Song) गाणं होतं. कित्येक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरच्या नजरेत जेव्हा हे गाणं आले तेव्हा त्यांनी या गाण्याचे रिमेक बनवले होते. त्यातून कच्चा बादाम फेम भुवनची क्रेझ कमालीची वाढली होती. कित्येकांनी भुवनला कच्चा बादामनं मोठी फेम आणि पैसा मिळवून दिला. दरम्यानच्या काळात भुबनला काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. त्याचा अपघातही झाला होता. यासगळ्यात भुवननं आपल्याकडून झालेल्या चुकांप्रती दिलगिरी व्यक्त केली होती.

जेव्हा भुवनला लोकप्रियता आणि पैसा मिळायला सुरुवात झाली तेव्हा मात्र लोकांनी त्याला नावं ठेवण्यास सुरुवात केली होती. नेटकऱ्यांनी भुवनची कानउघाडणी केल्यानंतर त्यानं काही गोष्टींबाबत कबुली दिली आहे. त्यानं आपल्याला जी लोकप्रियता मिळाली त्यातून आपली सारासार विचार करण्याची बुद्धी हरपल्याचे भुवननं सांगितलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही देखील त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता मला कळून चुकले आहे मी तेव्हा थोडा वाहवत गेलो होतो. त्याबद्दल शक्य झाल्यास नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी मला माफ करावे. मी आता पुन्हा पहिल्यासारखा जगु लागलो आहे.

मी आता कुणी सेलिब्रेटी नाही. गरज पडल्यास पुन्हा शेंगा विकेल. पण तसं वागणार नाही. लोकप्रियतेच्या हव्यासापोटी काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या. त्याचा फटका मलाही बसला. खरं सांगतो तेव्हा माझं डोकं फिरलं होतं. मी काही दिवसांपूर्वी चारचाकीही खरेदी केली होती. पण हे सगळं व्यर्थ आहे. जीवनाचा खरा अर्थ कशात आहे हे मला कळलं आहे. आतापर्यत प्रेक्षकांनी एवढं प्रेम केलं. हे जास्त महत्वाचं आहे. त्यांच्या प्रेमाशिवाय एवढे काही शक्य नव्हते. केवळ बंगालच नाहीतर भारताच्या कानाकोपऱ्यातून मला लोकांचं प्रेम मिळालं. एका साध्या गावातील शेंगा विकणारा भुवन हा मीडियासमोर आला. लोकप्रिय झाला. त्यावेळी मी जर चुकलो असेल तर माफी मागतो. असेही भुवननं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT