Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: नेटकरी भडकले! कंगनाच नेमकं काय चाललय, स्वतःची तुलना थेट लता मंगेशकरांशी..

सकाळ डिजिटल टीम

कंगना रनौत हे बॉलिवूडमधील असं नाव आहे जे नेहमी आपल्या वक्तव्यामूळं चर्चेत असतं. कंगणा कधी कूणाबद्दल काय बोलेल याचा भरोसा नाही. कधी ती कुणाला झाडते तर कधी कुणाच्या कौतुकाचा वर्षाव करते. आता तर तिने काही वेगळंच केलयं. तिने तिची तुलना चक्क भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशीच स्वत:ची तुलना केली आहे.

कंगना राणौतने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गायिका आशा भोसले दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलत आहेत. व्हिडीओमध्ये आशा भोसले सांगत आहेत की, लता मंगेशकर कधीही लग्नसमारंभात गात नाही गायच्या. त्यांना कितीही पैसे देऊ केले तरी त्या लग्नात कधीच गायच्या नाहीत. हा व्हिडिओ शेअर करताना कंगना राणौतने सांगितले की, ती देखील असेच करते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कंगनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत डान्स इंडिया डान्स लिल मास्टरच्या स्टेजवरचा आहे. ज्यामध्ये आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. लतादीदींनी एकदा लग्नात दोन तासांच्या परफॉर्मन्ससाठी एक मिलीयन डॉलर्सची ऑफर त्यांनी कशी नाकारली हे त्यांनी सांगितले. या घटनेची आठवण करून देताना आशा म्हणाल्या, “तिला 5 मिलियन डॉलर्सची ऑफरही आली होती, तेही ऑफरही ती नाकारायची. ते कलाकारामध्ये असलं पाहिजे."

व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले, “याच्याशी सहमत! माझ्याकडे सर्वाधिक लोकप्रिय गाणी असूनही मी लग्न किंवा एखाद्या खाजगी पार्ट्यांमध्ये कधीही नाचले नाही. मोठी रक्कमेलाही नाही म्हटलं. व्हिडिओ पाहून आनंद झाला. लताजी खरंच खूप प्रेरणादायी आहेत."

कंगना 2023 मध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कंगना 'तेजस' चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT