Bollywood: Pathan Controversy,Smita Gondkar take stand on deepika padukone bikini controversy
Bollywood: Pathan Controversy,Smita Gondkar take stand on deepika padukone bikini controversy  Esakal
मनोरंजन

Smita Gondkar: "आता भगव्या रंगाची 'ब्रा' घालायचीही भीती वाटते ", दीपिकालाही स्मितानं दिला सल्ला

प्रणाली मोरे

Smita Gondkar: काही दिवसांपूर्वीच शाहरुख-दीपिकाच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं प्रदर्शित झालं अन् देशभरातून संतापाची लाट उसळली. अनेक हिंदू संघटनांनी त्या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेतला. दीपिकानं गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्यानं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला गेला. आणि त्याबरोबच 'पठाण' बॉयकॉटचा ट्रेन्डही सुरू झाला. इतकंच नाही तर काही संघटनांनी तर ज्या थिएटरमध्ये 'पठाण' रिलीज केला जाईल त्याला आग लावली जाईल असा धमकी वजा इशारा देखील दिला.(Bollywood: Pathan Controversy,Smita Gondkar stand on deepika padukone bikini controversy)

आता खरंतर बिकीनी हिंदीतच नाही तर मराठी सिनेमातही अनेक अभिनेत्रींनी घातली आहे. मराठीसाठी ते थोडं अधिक बोल्ड असल्यानं त्या-त्या वेळेला चर्चा वजा वादही झाले होते. मराठीत स्मिता गोंदकर,सई ताम्हणकर,सोनाली कुलकर्णी,अमृता खानविलकर अशा अनेकींनी बिकिनी घालून आपली फिगर फ्लॉन्ट केली होती. आणि खरंच या सगळ्याच जणींवर बिकिनी सुंदरही दिसली होती. म्हणूनच सध्या 'पठाण' सिनेमातील बिकिनी वादावर आम्ही अभिनेत्रींशी बोलून यावर त्यांचे मत जाणून घेणयाचा प्रयत्न केला. तेव्हा स्मिता गोंदकर हिनं आपली काही थेट मतं मांडली आहेत.

स्मिता पहिलं वाक्यच म्हणाली, ''हा जो काही रंगाचा वाद सुरु आहे त्यानंतर मला खरंच भीती वाटू लागली आहे. मी तर पहिल्यांदा माझं वॉर्डरोब चेक केलं आणि त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही नाही ना हे आधी पाहिलं. आता तर भगव्या रंगाची ब्रा घालण्याचे देखील दडपण येईल. चुकून कुठे कुणाच्या नजरेस पडली तर आपलं काय करतील हे लोक याचा विचारही करून भिती वाटतेय''.

स्मिता यासंदर्भात पुढे म्हणाली,''ज्या भगव्या रंगावरनं वाद सुरु केलाय,हिंदू धर्माचा पवित्र रंग म्हणून बोललं जात आहे मग याबाबतीत मी दीपिकाला सल्ला देईन की तिनं सरळ हिरव्या रंगाच्या हॉट बिकिनीत स्वतःचा फोटो पोस्ट करावा म्हणजे प्रश्नच मिटेल. आता यावरनं स्निताचा नेमका कुणाकडे इशारा आहे हे लक्षात आलेच असेल आपल्या.

''खरंतर आता जग पुढे चाललंय. ग्लोबलायझेनमुळे पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढतोय,पण त्याहूनही अधिक आता आपण हवामान बदलतं तसे कपडेही घालतो. मग हा तर सिनेमा आहे...जागतिक स्तरावर तो पाहिला जातो. आणि सिनेमातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात. आणि जर ते सुंदर दिसत असतील तर का घालू नयेत. कुठे ते चांगले दिसले नसते तर प्रश्न वेगळा होता. पण उगाचच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं जो वाद सुरु आहे तो मला काही पटलेला नाही''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT