Rajpal Yadav Hit Student during Shooting in Uttarpradesh Prayagraj Google
मनोरंजन

Bollywood: राजपाल यादव अडचणीत! 'प्रयागराज'मध्ये एका विद्यार्थ्यानं अभिनेत्याविरोधात केली तक्रार...

प्रयागराज मध्ये राजपाल यादव त्याचा आगामी सिनेमा 'लक्ष्मी टॉकीज' चे शूटिंग करत असताना त्याच्या हातून मोठी चूक झाली आहे.

प्रणाली मोरे

Bollywood: राजपाल यादव अडचणीत...

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव हा अडचणीत सापडताना दिसत आहे. तो उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजच्या कटरा एरियात सिनेमाचं शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यान त्याला मोटरबाईक चालवायची होती. यादरम्यान त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं एका विद्यार्थ्याला गाडीनं ठोकलं. यानंतर विद्यार्थ्यानं सिनेमाच्या टीमवर आरोप करत पोलिसांकडे थेट यांसदर्भात तक्रार नोंदवली आहे.

त्यावेळी राजपाल यादवनं देखील पोलिसांकडे काही लोक शूटिंगमध्ये व्यत्यय आणत होते अशी तक्रार केली आहे. या प्रकरणात आता पोलिसांचे म्हणणे आहे की अभिनेता एक जुनी मोटर बाईक चालवत होता,ज्याचे क्लच वायर तुटले आणि चुकून अभिनेत्याने मोटरबाईकनं विद्यार्थ्याला ठोकलं. विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नाही असं देखील पोलिसांनी नमूद केलं. या प्रकरणात आता चौकशी सुरू आहे. हा गोंधळ उडाल्यानंतर काही काळानं पुन्हा शूटिंगला सुरुवात केली गेली.(Rajpal Yadav Hit Student during Shooting in Uttarpradesh Prayagraj)

शूटिंग दरम्यान विद्यार्थ्याला राजपालच्या गाडीनं दिली धडक...

माहितीनुसार,राजपाल यादवचा आगामी सिनेमा 'लक्ष्मी टॉकीज' मधील एका सीक्वेन्सचं शूटिंग सुरू आहे. हे शूटिंग खूप सकाळी होत होतं. सिनेमाचं शूटिंग पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी तिथं झाली होती. तिथे काही शालेय विद्यार्थी देखील होते. बोललं जात आहे की, राजपाल यादव मोटरबाईक चालवत होता,पण अचानक त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यानं त्या विद्यार्थ्याला गाडी ठोकली. विद्यार्थ्यानं त्यानंतर आरोप केला की या प्रकरणानंतर सिनेमाच्या टीमने त्याची माफी मागितली नाहीच उलट त्याला शिवीगाळ केली आणि मारलं देखील. तर सिनेमाच्या टीमने आरोप केला की लोकांना सिनेमाच्या शूटचं रेकॉर्डिंग करू नका असं बजावलं असताना देखील काही लोक तिथे मोबाईलनं शूट करत होते.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात...

उत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे राजपाल...

राजपाल यादव बॉलीवूडचा प्रसिद्ध विनोदी कलाकार आहे. त्याला 'वक्त','डरना मना है','ढोल' अशा सिनेमातून आपण पाहिलेलं आहे. तो सिनेमांमुळेच नाही तर अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.

५ करोडची फसवणूक केल्याप्रकरणी राजपालला झालेली अटक...

राजपालचं वादांशी मोठं कनेक्शन आहे. काही वर्ष आधी त्याला ५ करोड रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी अटक केलं गेलं होतं. त्यानंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT