Rakul Preet Singh Chhatriwali safe sex topic poster out film will release on ott world Google
मनोरंजन

Bollywood: 'Safe Sex' वर भाष्य करणार रकुल प्रीत सिंग, 'छतरीवाली' सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष..

रकुल प्रीत सिंगचा 'छतरीवाली' सिनेमा Zee5 वर रिलीज होणार आहे.

प्रणाली मोरे

Rakul Preet Singh :१ डिसेंबरला जागतिक एड्स दिनी रकुल प्रीत सिंगनं मोठं सरप्राइज दिलं आहे. अभिनेत्रीचा आगामी सिनेमा 'छतरीवाली' विषयी मोठी घोषणा झाली आहे. रकुल प्रीत सिंग 'छतरीवाली' सिनेमाच्या माध्यमातून सुरक्षित संभोग या विषयावर भाष्य करताना दिसणार आहे. सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. पोस्टरमध्ये रकुलच्या हातात मानवी शरीराचा भलामोठा तक्ता दिसत आहे. आणि हसत हसत रकुल मानवी शरीराविषयी ज्ञान देताना दिसत आहे. आता एवढं हसत हसत कोणी एखादा रटाळ विषय शिकवला तर तो नक्कीच आवडेल नाही का.(Rakul Preet Singh Chhatriwali safe sex topic poster out film will release on ott world)

रकुल प्रीत सिंगचा 'छतरीवाली' सिनेमा Zee5 वर रिलीज होणार आहे. अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. जागतिक एड्स दिनावर सिनेमाचं पोस्टर आऊट करत लोकांना सुरक्षित संभोग विषयी मेसेज देण्यात आला आहे. आता या विषयावर बनणारा 'छतरीवाली' काही पहिला सिनेमा नाही,जो लोकांना सेक्सविषयी ज्ञान देणार आहे. याआधी नुसरत भरूचानं देखील 'जनहित में जारी' या सिनेमातून सुरक्षित संभोग विषयी ज्ञान दिले होते. लो बजेट मध्ये बनलेल्या या सिनेमाला लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता. आता पहायचं रकुलचा 'छतरीवाली' सिनेमा प्रेक्षकांच्या किती पचनी पडतोय.

खरंतर सेक्स या विषयावरच लोक मोकळेपणाने संवाद साधताना दिसत नाहीत. याविषयावर चर्चा होणं,संवाद साधणं काळाची गरज आहे. आणि म्हणून तेजस प्रभा विजय देओस्करनं 'छतरीवाली' सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवालानं केली आहे. तर रकुल प्रीत सिंग सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त सुमिल व्यास आणि सतिश कौशिक सारखे कलाकारही सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये रकुल प्रीत सिंग कॉन्डोमचं पॅकेट हातात घेऊन दिसली होती. सिनेमाच्या फर्स्ट लूकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याआधी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाईल असं बोललं जात होतं पण आता निर्मात्यांनी सिनेमा ओटीटी वर रिलीज करायचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT