Tiger Shroff esakal
मनोरंजन

Tiger Shroff: ॲक्शन सीन टायगरला पडला महागात पायाला गंभीर दुखापत...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अनेक अभिनेते आहेत मात्र त्यात टायगर श्रॉफ याने त्याच्या फिटनेस, डान्स आणि अॅक्शन सीनने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्या  सर्वंच चित्रपटात तो जबरदस्त अॅक्शन सीन करतांना दिसतो. हे अॅक्शन सीन करतांना अनेकवेळा सेटवर छोटे मोठे अपघात होत असतात. असाच अपघात टाइगरसोबत घडला आहे. या अपघातात त्याला गंभीर दुखापतही झाली आहे.

नुकताच टायगर श्रॉफने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अॅक्शन सीन करतांना दिसत आहे. यात तो स्टंट करत वॉश बेसिन फोडतो आहे. मात्र यावेळी त्याचा पाय मोडल्याचे दिसत आहे.

इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने लिहिले की, 'काँक्रीट वॉश बेसिन तोडताना माझा पाय मोडला.मला जितकं वाटत होतं त्यापेक्षा मी अधिक मजबूत आहे. पण माझ्या बचावात बेसिनही तुटले. व्हिडिओमध्ये टायगर एका माणसासोबत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. दरम्यान, तो माणूस स्वत:चा बचाव करण्यासाठी समोर वॉश बेसिन आणतो आणि टायगरने ते पायाने तोडतो. त्यातच त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

टायगरच्या या व्हिडिओवर त्याचे चाहते आणि सेलेब्स कमेंट करत त्याच्या तब्येतीबाबत विचारणा करत आहे. गायक शानने लिहिले की, 'तुम्ही अविश्वसनीय आहेस, परंतु तु देखील माणूसच आहे हे जाणून आनंद झाला' , त्यानंतर आयशा श्रॉफने टायगरचे नाव लिहून अनेक इमोजी कमेंट्स लिहिल्या. त्याचवेळी शिल्पा शेट्टीने लिहिले, 'ओह गॉड टायगर', त्यानंतर दिग्दर्शक साबीर खानने लिहिले, 'या दिवशी आम्ही 24 तास शूटिंग केले. खूप भयानक' दिग्दर्शकाच्या कमेंटवरून हा टायगरचा जुना व्हिडिओ असल्याचं समजतंय.

दिग्दर्शक साबीर खान आणि टायगरने 'हिरोपंती', 'मुन्ना मायकल' आणि 'बागी'मध्ये एकत्र काम केले आहे. टायगर श्रॉफ अक्षय कुमारसोबत 'गणपत' आणि नंतर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT