who is shahrukh Khan,Deepika Padukone Designer shaleena nathani besharam rang pathan  Google
मनोरंजन

Pathaan: कोणाच्या सांगण्यावरनं दीपिकानं घातली भगवी बिकिनी?, फॅशन डिझायनर आली चर्चेत..

'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका आणि शाहरुख दोघंही कूल दिसत आहेत, पण त्यातील दीपिकाच्या आऊटफिटवरनं जोरदार वाद मात्र पेटला आहे.

प्रणाली मोरे

Pathaan: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान तब्बल ४ वर्षानंतर 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. किंग खानचे चाहते देखील अगदी चातकासारखी त्याच्या सिनेमाची वाट पाहत आहेत. सिनेमा रिलीज व्हायला थोडा अवकाश आहे म्हणूनच लोकांच्या आनंदासाठी शाहरुखनं सिनेमातलं 'बेशरम रंग' हे तडक-फडक गाणं रिलीज केलं आहे.

मात्र गाणं रिलीज झाल्यानंतर लगोलग गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरनं खळबळ सुरू झाली. 'बेशरम रंग' गाण्यावरनं इतक्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्यानं की नक्कीच आता यामागचा कर्ता-करविता कोण आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली असणार. तेव्हा चला जाणून घेऊया 'बेशरम रंग' गाण्यातील शाहरुख-दीपिकाच्या आऊटफिटची डिझायनर नेमकी कोण आहे त्याविषयी.(who is shahrukh Khan,Deepika Padukone Designer shaleena nathani besharam rang pathan)

'बेशरम रंग'' मध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या आऊटफिटना देशातल्या टॉपच्या स्टायलिशनं म्हणजे शालीन नथानीनं डिझाइन केलं आहे. शालीन इंडस्ट्रीत स्टार्सना हटके लूक देण्यासाठी ओळखली जाते. तोच तिचा स्पेशल टच 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका-शाहरुखचे आऊटफिट पाहून समोर आला आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर शालीन आपल्या कामावर भलतीच खूश दिसत आहे.

शालीन यासंदर्भात मत व्यक्त करताना म्हणाली,''सिद्धार्थ आनंदने मला गाण्याचा संदर्भ सांगितला होता. ते कोणत्या पार्श्वभूमीवर घडतंय,स्टोरीशी त्याचं कनेक्शन काय आहे याचा अंदाज त्यानं मला दिला होता. सिनेमात 'बेशरम रंग' गाण्याचं महत्त्व देखील त्यानं सांगितलं होतं. त्यामुळे दीपिकाला एकदम बेफिकीर आणि बिनधास्त अंदाजात मला दाखवायचं होतं. दिग्दर्शकाची सुद्धा डिमांड होती की या गाण्यात शाहरुख आणि दीपिका असे दिसले पाहिजेत की त्यांना आधी कुणीच तसं पाहिलं नसेल''.

शालीनचं म्हणणं आहे की, मला मनापासून या गाण्यातील आऊटफिटवर हटके काम करायचं होतं. ती म्हणाली,''माझी इच्छा होती की मी या गाण्याला माझ्या आऊटफिटच्या माध्यमातून असं सादर करेन की आधी कुणीच तसं पाहिलं नसेल. मला दोन्ही स्टार्सचे आऊटफिट एकदम वेगळे हवे होते. दीपिकानं ज्या पद्धतीचे स्वीमूट घाटले आहेत,त्यासाठी जे रंग वापरलेत ते खूपच वेगळे आहेत. शाहरुखला देखील काही अॅक्सेसरीज घालायला लावून कूल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणं ट्रोल करत असले तरी अनेकांच्या मनात हे गाणं बसलं आहे''.

शालीनचं म्हणणं आहे की या गाण्यात दीपिका आणि शाहरुख खूप कूल आणि सहज दिसत आहेत. खूप कॅज्युअल कपडे गाण्यात वापरले आहेत. या आऊटफिटना घालून कोणीही बाहेर जाऊ शकतं. एक डान्स नंबर म्हणून नाही तर गाण्याचा मूड पाहून आपण त्याच्यातील आऊटफिट डिझाइन केल्याचं शालीन म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT