Bomb Scare  Esakal
मनोरंजन

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रच्या घर बॉम्बनं उडवण्याची धमकी! एका फोन कॉल अन् मुंबई पोलिसांचं धाबंच दणाणलं

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेते ज्यांनी अभिनयानं मनोरंजन क्षेत्राला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली असे अभिनेते अमिताभ बच्चन,अभिनेते धर्मेंद्र यांच्या संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन,अभिनेते धर्मेंद्र आणि देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवरांची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे .

हा फोन कॉल आल्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे. याप्रकरणी तात्काळ नागपूर पोलिसांनी सर्व माहिती मुंबई पोलिसांना दिली.

ज्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली होती त्या ठिकाणी बॉम्बशोधक पथक पोहोचले आहेत. पोलिसांनी शोधमोहीमही सुरू केली आहे.

याशिवाय त्या अज्ञात व्यक्तीने 25 लोक दादरला पोहोचले असून ते हल्ल्याची योजना आखत असल्याची धमकीही दिली. या फोन कॉलनंतर नागपूर पोलीस याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहेत.

आत सर्व यत्रंणा या प्रकरणाचा तपास करत असून ही खोटी धमकी आल्याचं बोललं जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मुकेश अंबानींना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ऑगस्ट २०२२ मध्ये अँटिलियाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

कालच, सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशभरात आणि परदेशात सर्वोच्च दर्जाची Z+ सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अभिनेते अमिताभ बच्चन , अभिनेते धर्मेंद्र यांच्या सुरक्षिततेसाठी शासन काय पाउल उचलते हे पाहणेही महत्वाचे ठरेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad News: धुळे-सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; बारामती अॅग्रोने मान्य केली ३,३११ रुपयांची पहिली उचल

Polio Drops : पुणे महापालिकेच्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेत २ लाख ८५ हजार ३६९ बालकांना डोस; वंचित बालकांसाठी सोमवारपासून घरोघरी आरोग्य पथके

Nitin Nabin : काही लोक परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, राहुल गांधींवर नितीन नवीन यांची जोरदार टीका

Marathi News Live Updates : ऊसतोड मजूर महिलांची वेदनादायी अवस्था! चार दिवसांची सुट्टी परवडत नाही म्हणून गर्भाशय काढण्याची वेळ?

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद! भारताची सुरुवातच खराब,नेमकी कशी पडली वैभवची विकेट?

SCROLL FOR NEXT