Brahmastra Breaks Dhoom 3 Records  esakal
मनोरंजन

Brahmastra ने मोडले धूम-३ चे विक्रम, राजामौली-एनटीआरची मिळाली साथ

रणबीर कपूर आणि आलिय भटच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने धूम-३ चे विक्रम मोडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Brahmastra Box Office Collection And Ranbir Kapoor, Alia Bhatt Film Breaks Dhoom 3 Record : रणबीर कपूर-आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केवळ हिंदी पट्ट्यातच नाही तर आंध्र प्रदेश/तेलंगणासारख्या तेलुगू राज्यांमध्येही या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.

सुरुवातीचे आकडे पाहता, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एस.एस. राजामौली आणि ज्युनियर एनटीआर यांच्या उपस्थितीने 'ब्रह्मास्त्र'ने (Brahmastra Movie) सीमोल्लंघन केले असल्याचे दिसते. स्थिती अशी की या चित्रपटाने बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'धूम ३' चित्रपटाचा नऊ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

दोन्ही चित्रपटांची कमाई जास्त

प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, अयान मुखर्जीच्या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या तेलुगू भाषिक राज्यांमध्ये चांगली कमाई केली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने तेलुगू बॉक्स ऑफिसवर ४ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचवेळी, आमिर खानच्या 'धूम ३' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या हिंदी चित्रपटाने तेलुगू राज्यांमध्ये सुमारे दोन कोटींचे कलेक्शन केले होते.

धूम ३ चा हा विक्रम मोडायला रणबीर पिछाडीवर

दुसरीकडे, एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) - आलिया भट (Alia Bhatt) चित्रपट ब्रह्मास्त्रने पहिल्या दिवशी ३६ कोटींचा व्यवसाय केला आहे. हे कलेक्शन या वर्षी रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा जास्त असले तरी बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षा खूपच कमी आहे.

धूम ३ चे (Dhoom 3 ) उदाहरण घेतले तर आमिर खानच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३६.२२ कोटींची कमाई केली होती. म्हणजेच ओपनिंग डेच्या बाबतीत रणबीर आमिर खानला (Aamir Khan) मात देऊ शकला नाही.

दोन्ही चित्रपटांची कमाई

चित्रपट धूम 3 ब्रह्मास्त्र

तेलुगु २ कोटी ४ कोटी

हिंदी ३३.४२ कोटी ३२ कोटी

एकूण ३६.२२ कोटी ३६ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT