Brahmastra way behind the kashmir files in second weekend could become moderate hit
Brahmastra way behind the kashmir files in second weekend could become moderate hit Google
मनोरंजन

द काश्मिर फाईल्सच्या 'या' रेकॉर्डला तोडूच शकत नाही रणबीरचा ब्रह्मास्त्र,जाणून घ्या..

प्रणाली मोरे

Brahmastra boxoffice Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाकडून जेवढी आशा केली जात होती, त्यापेक्षा सिनेमानं जरा जास्तच कमाई केली आहे. जागतिक स्तरावर सिनेमानं बॉक्सऑफिसवर १० दिवसांत ३६० करोडची कमाई करत ग्रॉस कलेक्शन केलं आहे. भारतात सिनेमानं २१५ करोडहून अधिक कमाई केली आहे,ज्यामध्ये फक्त हिंदी व्हर्जनचा वाटा १९६ करोडहून अधिक आहे.

बॉक्सऑफिसवर दुसऱ्या आठवड्यात ब्रह्मास्त्रचं कलेक्शन ४२ करोडहून अधिक झालं आहे. पहिल्या आठवड्यात १२४ करोड रुपयांच्या आसपास सिनेमानं कमावले आहेत. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा आकडा घसरला असला तरी देखील तो ठीकठाकच आहे असं म्हटलं जाऊ शकतं.

ब्रह्मास्त्रची आतापर्यंतची कमाई पाहता आता सिनेमाची टक्कर थेट द काश्मिर फाईल्सशी असणार,जो २०२२ मधला बॉलीवूडचा हिट सिनेमा आहे. पण ब्रह्मास्त्रची दुसऱ्या आठवड्याची कमाई पाहिली तर विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मिर फाईल्सनं असा रेकॉर्ड करून ठेवलाय की ब्रह्मास्त्र या वर्षाच्या शेवटपर्यंत टीकून राहिला तरी काश्मिर फाईल्सचा रेकॉर्ड मोडू शकणार नाही.

एकामागोमाग एक फ्लॉप झालेल्या बॉलीवूड सिनेमांमध्ये द काश्मिर फाईल्सने बॉक्सऑफिसवर अशी कमाल केली की जिला पाहून ट्रेड एक्सपर्ट्सही चक्रावले होते. पहिल्या आठवड्यात २७.१५ करोडची कमाई करुन सुरुवात करणाऱ्या द काश्मिर फाईल्सनं,दुसऱ्या आठवड्यात ७० करोडहून अधिक कमाई केली होती. म्हणजे पहिल्या वीकेंडहून अधिक दुसऱ्या वीकेंडला दुप्पटहून अधिक कमाई केली होती.

यावर्षी अनेक बॉलीवूड सिनेमांना बॉक्सऑफिसवर संघर्ष करावा लागला. हाताच्या बोटावर मोजता येतील असे सिनेमे आहेत ज्यांना आपण हिट म्हणू शकतो. अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे','सम्राट पृथ्वीराज',आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' आणि खुद्द रणबीर कपूरचा 'शमशेरा' सारखे बड्या बजेटचे सिनेमे ज्यांना बॉक्सऑफिसवर मोठा झटका बसला. या सिनेमांच्या अपयशात मोठी भूमिका कोणी बजावली असेल तर ती, पहिल्या वीकेंडच्या तुलनेत दुसऱ्या वीकेंडची बॉक्सऑफिसवरची या सिनेमांची कमाई खूपच थंड राहिली.

अशामध्ये ज्या सिनेमांनी दुसऱ्या वीकेंडमध्ये थोडी कमाई केली ते सिनेमे हिट झाले. २०२२ मध्ये हिट झालेल्या सिनेमांचे दुसऱ्या आठवड्यातील बॉक्सऑफिसचे कलेक्शन काहीसे अशाप्रकारचे राहिले आहे...

द काश्मिर फाईल्स-७०.१५ करोड

ब्रह्मास्त्र-४२.४८ करोड

भूलभूलैय्या २- ३०.६४ करोड

गंगूबाई काठियावाडी-२३.२९ करोड

जुग जुग जियो- १३.९ करोड

आता ब्रह्मास्त्र समोर तिसऱ्या आठवड्यात मोठी टक्कर देणारा कोणताच दुसरा सिनेमा नाही आहे. सनी देओल,दुलकर सलमानचा 'चुप' जरी शु्क्रवारी रिलीज होणार असला तरी बॉक्सऑफिसवर हा सिनेमा तगडी कमाई करेल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीय. अर्थात,लोकांना सिनेमा आवडला तर तो चालूही शकतो. पण ती प्रोसेस फार धीम्या गतीनं असेल.

अशात ३० सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या 'विक्रम वेधा' आणि 'पोन्नियन सेल्वन' आधी ,ब्रह्मास्त्रकडे हळूहळू कमाई करण्याची पूर्ण संधी आहे. आता पहायचं की ब्रह्मास्त्र या सगळ्या जुळून आलेल्या गणितांचा कसा फायदा उचलतो ते आणि त्याचं टोटल कलेक्शन कोणत्या आकड्यावर येऊन थांबतं ते. हो,पण दुसऱ्या वीकेंडची ब्रह्मास्त्रची कमाई थंड राहिल्यानं सिनेमाच्या हातातून द काश्मिर फाईल्सच्या दुसऱ्या वीकेंडच्या कमाईचा रेकॉर्ड तोडण्याची संधी निसटली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT