Chiyaan Vikram Breaks Silence on Rumours of Heart Attack Google
मनोरंजन

Heart Attack च्या अफवेवर भडकला अपरिचित फेम विक्रम; म्हणाला,'आता छातीवर...'

विक्रमला काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं,तेव्हा त्याला हार्ट अटॅक आल्याचं वृत्त जोरदार व्हायरल झालं होतं.

प्रणाली मोरे

अपरिचित फेम विक्रमला(Vikram) काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. ही घटना त्याच्या आगामी 'पोन्नियन सेल्वन' या सिनेमाच्या टीजर लॉंचला काही तास उरले असतानाचा घडली. त्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरली की, विक्रमला हृद्यविकाराचा(Heart Attack) झटका आल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये(Hospital) दाखल केलं आहे. मात्र त्यानंतर हॉस्पिटलचे प्रवक्ता आणि विक्रमचे मॅनेजर सूर्यनारायणन एम यांनी या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही असं म्हटलं होतं.(Chiyaan Vikram Breaks Silence on Rumours of Heart Attack)

आता या सगळया अफवांमध्ये दस्तुरखुद्द विक्रमनं समोर येऊन आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. विक्रम म्हणाला,''सोमवारी ११ जुलै रोजी,माझ्या आगामी 'कोबरा'(Cobra) सिनेमाच्या ऑडियो लॉंच दिवशी मी प्रकृती संदर्भात तक्रार करीत म्हटलं होतं की,थोडं अस्वस्थ वाटत आहे आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. पण त्यानंतर माहित नाही काय झालं माझ्या प्रकृतीसंदर्भात अफवेचा नुसता पुर आला. मी एकदम उत्तम आहे आणि जेव्हा तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात तेव्हा मला काय होणार. माझं कुटुंब,मित्रपरिवार,चाहते सगळे माझ्यासोबत आहेत''.

विक्रमने आपल्याविषयी हार्ट अटॅकच्या चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की,''त्याच्या तब्येतीसंदर्भात खूप अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर मी पाहिलं,कुणीतरी एका आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर माझा फोटो मॉर्फ करत तो व्हायरल केला होता. त्यामुळे माझे चाहते उगाचच चिंताग्रस्त झाले''.

विक्रम म्हणाला,''मला आता माझा हात माझ्याच छातीवर देखील ठेवायला नको,नाहीतर लोक लगेच दावा करतील मला हार्टअटॅक आला आहे. मी याचा अंदाजा नक्कीच लावू शकतो की उदया माझ्या संदर्भात काय हेडलाईन असेल. आता ते लोक म्हणून शकतात की जे ते म्हणाले होते ते विक्रमनं आता कन्फर्म केलं आहे. किंवा मग म्हणतील,विक्रमला 'कोबरा' सिनेमाच्या ऑडियो लॉंच दरम्यान हार्ट अटॅक आला होता''.

विक्रम च्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्याचा कोबरा सिनेमा येत्या ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रीनिधी शेट्टी,मिया जॉर्ज, रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहे. याच सिनेमातून क्रिकेटर इरफान पठाण अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT