CM Eknath Shinde Watch Balbharti Marathi movie Trailer and comment on it. Google
मनोरंजन

CM Eknath Shinde: अन् मुख्यमंत्री मनापासून हसले..; 'बालभारती'चा ट्रेलर पाहून दिली उत्स्फुर्त प्रतिक्रिया

‘बालभारती’मध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी मध्यवर्ती भूमिकेत तर अभिजित खांडकेकरची विशेष भूमिका आहेत.

प्रणाली मोरे

'Balbharti' Marathi Movie: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ‘बालभारती’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले असून या चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या आपल्यासाठी जिव्हाळ्याच्या गोष्टीना एकत्र जोडतो, असे गौरवोद्गार श्री शिंदे यांनी काढले आहेत.(CM Eknath Shinde Watch Balbharti Marathi movie Trailer and comment on it.)

माननीय मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर आवडीने पहिला आणि त्यावरील आपले म्हणणे व्हिडीओ चित्रित करून दिले. त्याचबरोबर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

बालभारती चित्रपटाचा ट्रेलर मी पहिला आणि मला तो खूप आवडला. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या अगदी जिव्हाळ्याच्या अशा मुद्द्यांना एकत्रित जोडतो. पालकांची आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलची कळकळ या चित्रपटात अगदी गमतीशीर पद्धतीने मांडली गेली आहे. मी ‘बालभारती’च्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो,” असे उद्गार मा. मुख्यमंत्र्यांनी या संदेशात काढले आहेत.

या ट्रेलरचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बालदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाले. त्यांनीही या चित्रपटात हाताळल्या गेलेल्या विषयासाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे कौतुक केले आहे. ‘बालभारती’ हा मराठी चित्रपट येत्या २ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सर्वांच्या आवडीचा विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने सादर केला असल्याने ‘बालभारती’बद्दल उत्सुकता लागून राहिली आहेच पण अनेक गाजलेल्या हिंदी मालिका देणाऱ्या निर्मात्याकडून या चित्रपटाची निर्मिती होत असल्यानेही मराठी चित्रपटसृष्टीत त्याबद्दल विशेष कुतूहल आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले असून निर्माते कोमल व संजय वाधवा हे या चित्रपटाची निर्मिती त्यांच्या ‘स्फीयरओरिजीन्स’ या कंपनीच्या माध्यमातून करत आहेत. यात सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी यांच्या प्रमुख भूमिका असून ग्लॅमरस अभिजित खांडकेकर एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. रवींद्र मंकणी, संजय मोने आणि उषा नाईक या ज्येष्ठ कलाकारांच्या विशेष भूमिका या चित्रपटात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

ढिंग टांग - नवे संकल्प : एक (नुसतेच) चिंतन..!

SCROLL FOR NEXT