Deepika Padukone Cast in S.S.Rajamouli Action Adventure film Instagram
मनोरंजन

Deepika Padukone: एसएस राजामौलींच्या सिनेमात दीपिकाची एन्ट्री, जाणून घ्या बिग बजेट सिनेमाविषयी...

एसएस राजामौलींच्या या अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमाची खूप आधीपासून चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Deepika Padukone: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणला जॅकपॉट लागला आहे याची मोठी बातमी समोर येत आहे. बाहुबली आणि RRR सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या पुढील अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमात दीपिका पदूकोण दिसणार आहे. या साऊथ सिनेमात महेश बाबू मध्यवर्ती भूमिकेत आहेत. आता सगळं जुळून आलं तर दीपिका आणि महेश बाबू स्क्रीनवर रोमान्स करताना दिसतील. (Deepika Padukone Cast in S.S.Rajamouli Action Adventure film)

दीपिका पदूकोण सध्या एकापेक्षा एक बड्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ती शाहरुख सोबत 'पठाण' सिनेमात दिसणार आहे. तसंच,हृतिक रोशन सोबत 'फाइटर' सिनेमातही ती दिसणार आहेत. बाहुबली फेम प्रभास सोबतही दीपिका एक सिनेमा करतेय. आणि आता दीपिका आणखी एका बड्या सिनेमाचा भाग बनणार आहे असं वृत्त समोर येत आहे. एका बड्या साऊथ सिनेमाचा ती भाग बनणार आहे,जो अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

दीपिका एसएस राजामौलीच्या दिग्दर्शना अंतर्गत बनणाऱ्या सिनेमात महेश बाबू सोबत दिसू शकते. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सिनेमातील कलाकार आणि क्रू यांच्याविषयी सगळी माहिती फायनल झाल्यानंतर एसएस राजामौली एक कार्यक्रम आयोजित करु शकतात,जसं त्यांनी RRRसाठी केलं होतं आणि तशा कार्यक्रमातून अधिकृतरित्या दीपिकाचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं.

रिपोर्टनुसार मेकर्सला हा सिनेमा मोठ्या स्केलवर करायचा आहे. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी मेकर्स मेहनत घेणार आहेत. अद्याप सिनेमाचं नाव ठरलं नसलं तरी एसएस राजामौली यांनी सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं प्लॅनिंग सुरू केलं आहे.

एसएस राजामौली सध्या जपानमध्ये RRR च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. महेश बाबू सोबतच्या या बिग बजेट सिनेमावर ते पुढील वर्षी काम करणार आहेत. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे. आणि याच सिनेमाच्या माध्यमातून महेश बाबू बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT