Deepika Padukone struggled to walk in her orange gown during latest Cannes Film Festival outing
Deepika Padukone struggled to walk in her orange gown during latest Cannes Film Festival outing esakal
मनोरंजन

कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ, VIDEO

धनश्री ओतारी

बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आली आहे. या फेस्टिव्हलची ती ज्यूरी मेंबर आहे. रोज एक स्टनिंग लूक करत दीपिका रेड कार्पेटवर उतरताना दिसत आहे. नुकतंच ती ऑरेंज कलरचा गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर उतरली. मात्र, तिला परिधान केलेला गाऊन सांभाळताना नाकीनऊ झालं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दीपिका ऑरेंज गाऊनमध्ये प्रचंड अस्वस्थ दिसली. ड्रेस सांभाळताना दीपिकाची मोठी कसरत सुरु असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोण रेड कार्पेटवर ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये दिसली. मेक-अप, हेअरस्टाईलने तिच्या सौदर्यांत अधिक भर घातली होती. मात्र, तिनं परिधान केलेल्या ड्रेसने तिचा मूड खराब दिसला. कार्पेटवर आली असता तिचा संपूर्ण वेळ ड्रेस सावरण्यात गेला.

सोशल मीडियावर दीपिकाच्या फोटोंचा बोलबाला आहे. ती ज्युरी मेंबर्ससोबत पोज देताना दिसत आहे. यादरम्यान तिने एका हाताने तिचा ड्रेस पकडलेला दिसत आहे.

दीपिकाने २०२७ मध्ये फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. त्यानंतर पाच वर्षात आता तिने परीक्षकाचा मान मिळवला आहे. तिच्यासोबत ऑक्सर विजेते असगर फरहादी, जेफ निकोलस, रेबेका हॉल, नूमी रापेस, जास्मिन ट्रिंका, लेडी ली आणि जोशीम ट्रायर या परीक्षकांचा समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलला इतर सर्व फिल्म फेस्टिव्हल्सचा राजा मानलं जातं. रेड कार्पेट हा या फेस्टिव्हलमधील सर्वात दिमाखदार सोहळा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT