Deepika Padukone to Have a Surprise Cameo in Ranbir Kapoor-Alia Bhatt’s Brahmastra? Google
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र' सिनेमात दीपिका पदूकोण? रणबीर-आलियासोबत दिसणार 'या' भूमिकेत

'ब्रह्मास्त्र' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शाहरुख पाठोपाठ आता दीपिका पदूकोणच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

प्रणाली मोरे

करण जोहर आणि अयान मुखर्जी यांचा 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तब्बल ९ वर्ष झाली या सिनेमाला तयार होण्यासाठी.अखेर सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)यांचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमाविषयी अनेक उलट-सुलट चर्चा कानावर पडत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यावर सिनेमात शाहरुख खान(Shahrukh Khan) पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे अशी चर्चा जोरदार रंगली. आता नवीन बातमी कानावर पडतेय की 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दीपिका पदूकोणही(Deepika Padukone) दिसणार आहे.(Deepika Padukone to Have a Surprise Cameo in Ranbir Kapoor-Alia Bhatt’s Brahmastra?)

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार शाहरुख खान प्रमाणेच दीपिका पदूकोणही 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. दीपिका या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका वेबसाईटनं दावा केलाय की रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दीपिका पदूकोणची धमाकेदार एन्ट्री असणार आहे.

दीपिका पदूकोणनं याआधी करण जोहरसोबत अनेक वेळा काम केलेलं आहे. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र' सिनेमातही ती काम करणार याविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत. दुसरीकडे शाहरुखही सिनेमात पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

दीपिका पदूकोण सध्या हैदराबाद मध्ये शूट करीत आहे. ती सध्या अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत एका सिनेमाचं शूटिंग करीत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाला सेटवर तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT