मनोरंजन

Prakash Kaur : 'कुठल्याही पुरुषानं माझ्याऐवजी....' धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची काय होती प्रतिक्रिया?

यासगळ्यात देओल कुटूंबियांविषयीच्या काही वेगळ्या विषयांवरील बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Prakash Kaur : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या नातवाचे करणचे नुकतेच लग्न पार पडले. त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीही त्या करणच्या लग्नात सहभागी झाले होते. त्यात अनिल कपूर, अनुमप खेर, आमिर खान, सलमान खान यांची नावं घ्यावी लागतील.

यासगळ्यात देओल कुटूंबियांविषयीच्या काही वेगळ्या विषयांवरील बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक बातमी अशी की, बऱ्याच वर्षांनी देओल कुटूंबिय हे एकत्र आले होते. यापूर्वी सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओल आणि त्यांचे परिवार हे एकत्र आल्याचे प्रसंग फार कमी होते.

यावेळी मात्र यासगळ्यांनी एकत्र येत मौज केल्याचे दिसून आले. त्याचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

आता प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी धक्कादायक प्रतिक्रिया एका मुलाखतीमध्ये दिली होती. त्याला कारण होतं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यातील प्रेमप्रकरण. बॉलीवूडमध्ये ८० च्या दशकांतील सर्वाधिक गाजलेली लवस्टोरी म्हणजे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे नाव घ्यावे लागेल.

अजूनही या सेलिब्रेटींच्या प्रेमाचे किस्से चाहत्यांमध्ये विशेष प्रिय आहेत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले असताना देखील त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले.

सनी देओलची आई आपल्या नातव्याच्या लग्नाला हजर होती. त्यावेळी त्या अनेकांच्या चर्चेचा विषय होत्या. यासगळ्यात काही जून्या बातम्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यात अनेकजण हेमा मालिनीच्या बाबत प्रश्न उपस्थित करत होते. एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीनं हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्याविषयीच्या नात्यावर भाष्य केले होते.

तो विषय पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आतापर्यत एकच मुलाखत प्रकाश यांच्याबाबतची व्हायरल झाली आहे.

त्या म्हणाल्या, मला काही धर्मेंद्र यांना दोष द्यायचा नाही. तो दोष बॉलीवूडच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कल्चरचा आहे. १९८१ मध्ये प्रकाश यांनी स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, धर्मेंद्र यांच्या जागी कुणीही असतं तर त्यानं हेमा मालिनी सारख्या अभिनेत्रीशी लग्न केलं असतं.

माझ्या पतीनं काही चुकीचे केलेले नाही. आणि माझ्या पतीला कुणीही नावं ठेऊ नयेत. ते काय आहेत हे मला माहिती आहे. मला या इंडस्ट्रीबद्दल नाराजी आहे. त्यामध्ये जे काही होत आहे ते चूकीचे आहे. माझ्या वडिलांना देखील हे क्षेत्र फारसे आवडले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT