dharmveer trailer launched : uddhav thackeray on anand dighe  sakal
मनोरंजन

उद्धव ठाकरे: आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही, निष्ठा काय असते..

उद्धव ठाकरे म्हणाले, आनंद दिघे गेले त्यावेळी त्यांचे वय पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले.

नीलेश अडसूळ

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न (Marathi Movie) सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता प्रसाद ओक (pradad oak)आनंद दिघे यांची भूमिका साकारत असून त्यांचा पहिला लुकसमोर आल्यापासून चित्रपटबाबतअधिकच उत्सुकता वाढली आहे. शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला.

प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tarde) यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील गुरुपौर्णिमेचे गाणे आणि आणि टीजर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता उत्कंठा आहे ती 13 मे ची. अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट रिलीज होणार आहे. शनिवार वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेल मध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (uddhav thackeray) पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे (anand dighe) यांच्या कार्याबाबत गौरवाचे शब्द काढले. 'मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा त्यांना तहानभूक विसरुन काम करताना पाहिले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्यासारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करत. ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी 'धर्मवीर' चित्रपट जरूर पाहावा,' असे ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘आनंद दिघेंसारखी लाख मोलाची माणसं बाळासाहेब ठाकरेंना मिळाली. त्यांच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक मला मिळाले. धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या नावात ठाणेकरांचं ह्रदय असा उल्लेख हवा. निष्ठा म्हणजे काय असते हे आनंद दिघे यांच्याकडून शिकावं. आनंद दिघे यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT