siddaramayyah answered ajay devgan
siddaramayyah answered ajay devgan  sakal
मनोरंजन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले, अजय देवगणचा समाचार

नीलेश अडसूळ

हिंदी आहि भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि बॉलीवूड स्टार अजय देवगण यांच्यात सुरु झालेला वाढ वाढतच चाललेला आहे. या वादात कलाकारांनी आपले विचार व्यक्त करून हा वाद मिटवला असला तरी भाषा समर्थकांकडून यावर विविध मते व्यक्त केली जात आहेत. आता कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही आपले परखड मत नोंदवले आहे.

अभिनेता किच्चा सुदीपने एका चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान 'हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही. बॉलीवूड मधील कित्येक चित्रपट आहे तेलगू आणि तामिळ चित्रपटामधून प्रेरित होऊन केले जातात' असे विधान केले होते. हे विधान अजय देवगण (ajay devgan) याला चांगलेच खटकले.“माझ्या भावा, तुमच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन.” असे ट्विट अजयने केले. या ट्विटमध्ये त्याने सुदीपलाही टॅग केले होते.

अजयच्या त्या ट्विटवर सुदीपनेही उत्तर दिले. 'अजय देवगण सर, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला. पण मला जे म्हणायचं आहे ते कदाचित मी तुम्हाला भेटून अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता किंवा कोणत्याही वादाला सुरुवात करायची नव्हती. मी तसं का करेन सर..' असे ट्विट सुदीपने अजयला उद्देशून केले आहे.

'सर, मी आपल्या देशाच्या प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर करतो. हा विषय इथेच थांबावा अशी माझी इच्छा आहे, कारण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. तुम्हाला नेहमी खूप प्रेम आणि शुभेच्छा. लवकरच भेटूया..' असेही सुदीपने म्हंटले आहे. अजयनेही यावर व्यक्त होणे पसंत केले आहे,“तू माझा मित्रआहेस. आपल्यातील गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच चित्रपटसृष्टी एक आहे असा विचार करतो. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि प्रत्येकाने आमच्या भाषेचाही आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित, भाषांतरात समजून घेण्यात चूक झाली असावी.”असे उत्तर अजयने दिले आहे.

तर सुदीपने या संवादाचा शेवट मार्मिकपणे केला आहे. 'भाषांतरामुळे एखादी गोष्ट चुकीची समजली जाते. त्यामुळेच संपूर्ण प्रकरण जाणून घेणे गरजेचे आहे. मी तुम्हाला दोष देत नाही. कारण एका चांगल्या विषयावर संवाद साधण्यासाठी तुम्ही मला ट्विट केले याचा आनंद अधिक आहे,' असे सुदीपने म्हंटले आहे.

कलाकारांनी चर्चा करून आपापसात हा वाद मिटवला असला तरी हा वाद आता वाढत जाईल असते दिसते आहे. कारण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या वादात उडी घेतली आहे. तसेच हिंदी भाषेबाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे. 'हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा नाही आणि कधीही होऊ शकत नाही. किंबहुना भारतातील भाषिक विविधतेचा आदर करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्यच आहे. प्रत्येक भाषेला स्वतःचा समृद्ध इतिहास आहे ज्याचा तिथल्या नागरिकांना अभिमान आहे. मला गर्व आहे मी कन्नड असल्याचा..' असे ट्विट सिद्धरामय्या यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT