Milkuri Gangavva: सोशल मीडियाच्या युगात कोण कोणाच्या पुढे जात एका रात्रीत फेमस होईल याचा काही नेम नाही. रानू मंडल, बचपन का प्यार, काचा बदाम यांसारखे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. यामध्ये काही नावे अशीही आहेत ज्यांचा प्रवास वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तेलंगानाच्या ६२ वर्षीय मिल्कुरी गंगव्वाची सक्सेस स्टोरी फारच रंजक आहे.
६ वर्षाआधी मिल्कुरी गंगव्वाचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर ही महिला एवढी प्रसिद्ध झाली की आज तिची ओळख एका सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मजुर ते सेलिब्रिटीपर्यंतचा तिचा जीवप्रवास अनेकांना प्रेरित करणारा आहे. चला तर जाणून घेऊया ही ६२ वर्षांची आजी फेमस युट्यूबर बनली कशी?
जाणून घ्या कोण आहे गंगव्वा मिल्कुरी
६२ वर्षीय मिल्कुरी गंगव्वा या तेलंगानाच्या लम्बाडीपल्ली गावातील रहिवासी आहेत. मिल्कुरी यांची कहानी जेवढी प्रेरणादायी आहे तेवढाच खडतर त्यांचा जीवनप्रवास आहे. यूट्यूबर बनण्याआधी त्या मजुरी करायच्या. कुटुंबातील ५ लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही महिला शेतात रोजमजुरी करायची. मात्र आज ही महिला सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.
मेहनतीच्या बळावर केला कुटुंबाचा उदरनिर्वाह
तुम्हाला कदाचित हे वाचून आणखी आश्चर्य वाटेल. मिल्कुरी गंगव्वा फक्त पहिला वर्ग शिकल्या आहेत. त्यांचे पती दारू पिऊन त्यांची सतत मारझोड करायचे. कुटुंबात गरीबी आणि केवळ १ वर्ग शिक्षण झालं असतानाही त्यांनी त्यांच्या ४ मुलांच्या शिक्षणात कधी कमी पडू दिली नाही. त्यामुळेच त्यांची मुले आज उच्च शिक्षित असून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
आजी अशी बनली युट्यूबर
मिल्कुरी गंगव्वा यांचे जावई श्रीकांत श्रीराम My Village Show नावाचं एक युट्यूब चॅनल चालवतात. या चॅनलवर ते गावातील दैनंदिन दिनचर्या आणि कॉमेडी व्हिडिओज दाखवत असतात. असंच एक दिवस श्रीकांतने त्याच्या एका व्हिडिओत दादीलाही फिचर केलं होतं. व्हिडिओमधील गंगव्वा आजीचा साधाभोळा आणि निरागस चेहरा बघताच अनेकांना हा व्हिडिओ आवडला आणि काही दिवसांत तो प्रचंड व्हायरल झाला.
त्यानंतर त्यांच्या जावयाने गंगव्वा आजीला घेऊन व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. यात काही व्हिडिओमध्ये गंगव्वा आजी अॅक्टिंग करतानाही दिसत होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. सोशल मीडियावर एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर या ६२ वर्षीय आजीला तेलगु चित्रपट आणि टीव्ही सीरियलमधून ऑफरही यायला लागले.
फेमस आजी मिल्कुरी गंगव्वाने आतापर्यंत 'मल्लेशाम इस्मार्ट शंकर',' एसआर कल्यानामदापम', 'राजा राजा छोरा', 'लव स्टोरी' आणि 'गॉड फादर' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय आजीने अनेक तेलगु टीव्ही शोजमध्येही काम केले आहे. सोशल मीडिया फेम गंगव्वा आजी आज प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. एवढंच नाही तर तेलगु आणि तमिळ चित्रपटातील अनेक कलाकारही या आजीला फॉलो करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.