Farhan Akhtar Says Bollywood Needs to 'Up Their Game' Instagram
मनोरंजन

Bollywood च्या ढासळत्या कामगिरीवर फरहान अख्तर स्पष्टच बोलला, म्हणाला...

बॉलीवूड दिग्दर्शक,निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तर सध्या त्याच्या 'Ms Marvel' वेबसिरीजमुळे भलताच चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

(Bollywood) बॉलीवूड दिग्दर्शक,निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तर(Farhan Akhtar) सध्या त्याच्या 'Ms Marvel' वेबसिरीजमुळे भलताच चर्चेत आहे. फरहान अख्तर म्हणाला आहे की, सुपरहिरोवाल्या ओटीटी वेबसिरीजमध्ये काम करण्याचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता. फरहान हे देखील म्हणाला आहे की, आतापर्यंत हिंदी सिनेमांत कोणी मोठा आणि प्रसिद्ध सुपरहिरो झालेलाच नाही. पण बॉलीवूडचे हिरो गेल्या काही काळापासून असं काम करतायत जे हॉलीवूडचे सुपरहिरो करत आहेत.(Farhan Akhtar Says Bollywood Needs to 'Up Their Game')

बॉलीवूडमध्ये दिल चाहता है ,लक्ष्य आणि डॉन सारखे प्रसिद्ध सिनेमे बनवणाऱ्या फरहानने हॉलीवूड दिग्दर्शक रुसो ब्रदर्ससोबत मुंबईत बोलताना म्हटलं आहे की, जेव्हापासून माझ्या लक्षात आहे की, आमच्या बॉलीवूडच्या हिरोंनी खूप आधीपासून खलनायकांना मारुन मारुन हवेत उडवलंय. रुसो ब्रदर्स आपल्या 'द ग्रे मॅन' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आले होते. या सिनेमात धनुष महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या सिनेमांना बॉक्सऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांचीच नाही तर हॉलीवूडच्या सुपरहिरोंच्या सिनेमांची देखील तगडी टक्कर मिळत आहे. फरहान अख्तर जो दिग्दर्शन आणि अभिनयासोबतच एक प्रॉडक्शन कंपनी देखील चालवतो,त्यानं यावर म्हटलं आहे की, ''भले बॉलीवूडच्या सिनेमांकडे हॉलीवूडशी टक्कर देण्या इतपत मोठं बजेट नसेल, पण आता 'कांटे की टक्कर' देण्याची तयारी सुरु करायला हवी''.

फरहान पुढे म्हणाला,''भले भारतीय सिनेमांकडे हॉलीवूड सारखी वीएफएक्सची ताकद आणि बजेट नाही, पण आपल्याला आपल्या सिनेमांमध्ये सुधारणा करायला हवी, प्रेक्षक आता जगभरातल्या कलाकृती पाहत आहेत. त्यामुळे तुलना लगेच होऊ शकते''. फरहान अख्तरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो पुन्हा एकदा दिग्दर्शकीय भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे. त्याचा आगामी 'जी ले जरा' सिनेमात प्रियंका चोप्रा,कतरिना कैफ,आलिया भट्ट मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT