Farmani Naaz Sing Lata Mangeshkar's Iconi Song, 'Ae Mere Watan ke Logo', People reaction...
Farmani Naaz Sing Lata Mangeshkar's Iconi Song, 'Ae Mere Watan ke Logo', People reaction... Google
मनोरंजन

स्वातंत्र्यदिनी फरमानी नाझनं गायलं 'ए मेरे वतन के लोगो', काय म्हणाले लोक?

प्रणाली मोरे

Farmani Naaz: १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक देशवासी हा देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघताना दिसत आहे. युट्युब गायिका फरमानी नाझ (Farmani Naaz) मुजफ्फर नगर मध्ये आयोजित १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात सामिल झाली होती, तिथे पोहोचल्यावर तिनं सुरुवातीला तिचं प्रसिद्ध झालेलं हर हर शंभू हे गाणं गायलं. हा कार्यक्रम संजीव बालियान या राजकीय नेत्यानं आयोजित केला होता.(Farmani Naaz Sing Lata Mangeshkar's Iconi Song, 'Ae Mere Watan ke Logo', People reaction...)

या देशभक्तीपर कार्यक्रमात मोठी गर्दी पहायला मिळाली. हातात तिरंगा घेऊन लोकांनी फरमानीच्या गाण्याला भरपूर एन्जॉय केलं. फरमानी सोबत उपस्थित लोकांनीही हर हर शंभू गाण्याचा ताल धरला होता. फरमानी नाझनं याच कार्यक्रमात 'हर हर शंभू' व्यतिरिक्त 'हर घर तिरंगा' हे गाणं देखील गायलं.

याच कार्यक्रमात फरमानी नाझनं लता मंगेशकर यांचे अजरामर गीत 'ए मेरे वतन के लोगो' हे देखील गायलं. यावेळी तिथे उपस्थित लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. लोकांनी या लता दिदींनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं गाणं फरमानीनं गायल्यावर त्याला देखील उत्तम दाद दिली. यानंतर फरमानी नाझचा सन्मानही करण्यात आला. १५ ऑगस्टच्या निमित्तानं फरमानी नाझचा सुरांनी भारलेला आवाज ऐकणं म्हणजे चाहत्यांसाठी मोठी ट्रीट ठरली. १५ ऑगस्टच्या दिवशी रिलीज झालेल्या फरमानी नाझच्या गाण्याला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गाण्याला मिलियन्स व्ह्यूज देखील मिळाले. सध्या फरमानी जे गाते ते हिट होताना दिसत आहे.

फरमानी नाझला तिच्या हर हर शंभू गाण्यानं मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. हे शिव भजन गायल्यानंतर तिला अनेक मुस्लिम धर्मीयांच्या धमक्यांना तसंच अपमानित शब्दांना सामोरं जावं लागलं. तिला कट्टरपंथियांनी ट्रोलही केलं. तिनं शिवभजन गाऊन धर्माचा अपमान केला असं हिणवलं देखील गेलं. पण फरमानी कुठल्याच धमक्यांना घाबरली नाही, जुमानली नाही. अर्थात त्यानंतर तिचं हर हर शंभू गाणं वादातही अडकलं. या गाण्याच्या मूळ गायकानं कॉपीराइट अॅक्ट अंतर्गत फरमानीविरोधात तक्रार केल्यानंतर युट्यूबवरनं हर हर शंभू गाणं हटवलं गेलं. अद्याप हा वाद सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Marathi News Live Update: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", जयराम रमेश यांची टीका

SCROLL FOR NEXT