Femina Miss India Winner Nandini Gupta Esakal
मनोरंजन

Femina Miss India: 'या' प्रश्नाच्या उत्तरानं राजस्थानच्या नंदिनीला बनवलं मिस इंडिया

Vaishali Patil

Femina Miss India Winner Nandini Gupta: फेमिना मिस इंडिया 2023 चा फिनाले नुकताच पार पडला. शनिवारी झालेल्या महाअंतिम फेरीत राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने हा मुकुट पटकावला आहे.

19 वर्षीय नंदिनी व्यतिरिक्त, दिल्लीची श्रेया पुंजा ही फर्स्ट रनर अप आणि मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग दुसरी रनर अप होती.

या फिनालेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चाहते तिन्ही स्पर्धकांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

नंदिनी गुप्ता हिने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या बुद्धीमत्तेने  तिने सर्वांची मनं जिंकली आहेत. तिने तिच्या उत्कृष्ट उत्तरांनी न्यायाधीशांचे मन जिंकले. तिची विनोदी शैली आणि हजरजबाबीपणा पाहिल्यानंतर सर्व न्यायाधीशांना तिचे कौतुक वाटू लागले.

फेमिना मिस इंडियाच्या मुकुटापर्यंत पोहोचण्याआधी नंदिनी गुप्ताला एक प्रश्न विचारण्यात आला. खरं तर, सर्व टॉप 7 स्पर्धकांना प्रश्न विचारताना एक एक करून पुढे बोलावले जाते. जिथे त्यांचे सामान्य ज्ञान, त्यांचा स्वभाव आणि त्यांचे विचार यांचा विचार करुन जज निरिक्षण देतात.

यावेळी न्यायाधीशांनी नंदिनीला विचारले होते की, जर तिला काही ऑप्शन दिले तर तिला काय बदलायला आवडेल, पहिलं जग की दुसरं स्वतः . हा प्रश्न ऐकून नंदिनीने वेळ वाया न घालवता तिचं उत्तर दिलं.

नंदिनी गुप्ता जिने स्वतःचं सुंदर प्रतिनिधित्व केलं तिने तिच्या उत्तरात सांगितलं की तिला स्वतःला बदलायला आवडेल. ती म्हणाली की ज्या प्रकारे तिला घरातून कौतुक आणि दानशूरपणाची समज मिळते, त्याचप्रमाणे बदल घरातूनही येतो.

जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद असेल तर तुम्ही जग बदलू शकता. याशिवाय नंदिनीने तिच्या उत्तरात तिचा नवा लूक स्वीकारल्याबद्दलही सांगितले. तिचं उत्तर ऐकल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

फेमिना मिस इंडिया 2023 चा खिताब जिंकणारी 19 वर्षीय नंदिनी गुप्ता हिचा जन्म राजस्थानमध्ये झाला होता. त्याचबरोबर ती व्यवसायाने मॉडेल आहे. तिने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT