Pushpa Movie esakal
मनोरंजन

आता तर हद्दच झाली! परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'

विशाल गुंजवटे

गेल्या काही दिवसांपासून 'पुष्पा' चित्रपटानं सर्व रेकॉर्ड तोडत आपलं प्रदर्शन केलंय.

बिजवडी (सातारा) : देशभरात 'पुष्पा' (Pushpa Movie) या चित्रपटानं धुमाकूळ घातला असून त्यातील गाणी, डॉयलॉग व डान्सनं सर्वांच्याच हृदयात घर केलं आहे. यातील श्रीवल्ली, सामी सामी या गाण्यांनी तर हद्दपार केली आहे. प्रत्येकाच्या तोंडात या गाण्यांची गुणगुण चालू आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षाही (10th Board Exam) तोंडावर आल्या असताना दहावीचे विद्यार्थीही (10th Student) पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. एका विद्यार्थ्यांवर तर चित्रपटाचा इतका फिव्हर चढला आहे की, त्यानं नजरचुकीनं सराव पेपरमध्ये 'सर्वपल्ली' लिहिण्याऐवजी 'श्रीवल्ली' लिहिलंय. शिक्षकांनी नेमकी ती चूक पालकांच्या लक्षात आणून दिल्याने आता पालक चिंताग्रस्त झालेत.

गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड तोडत आपले प्रदर्शन केले आहे. यातील गाणी व डान्सवरती छोटे-छोटे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात तरूणाई बरोबरच लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला वर्ग अग्रेसर दिसून येत आहे. फलटण तालुक्यात (Phaltan Taluka) अशाच एका शाळेत दहावीतल्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर चालू असताना एका प्रश्नात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) असा उल्लेख होता. या शाळेतील एका विद्यार्थ्यावर पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग, गाण्याची इतकी भुरळ पडली होती की, त्यानं उत्तर पत्रिकेत 'सर्वपल्ली' ऐवजी 'श्रीवल्ली' (Srivalli Song) असा लिखाणात उल्लेख केला आहे. त्याचा पेपर तपासताना शिक्षकाच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी संबंधित पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची 'श्रीवल्ली' चूक दाखवून दिली. पालकवर्गही विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यांना कंटाळले असून मोबाईल, चित्रपट, गेममध्ये गुंतलेले विद्यार्थी दहावी तर उत्तीर्ण होतात की, नाही या विवंचेनेत दिसून येत आहेत.

दहावीची परीक्षा आपल्या आयुष्याची पहिली पायरी

कोरोना काळामुळं दोन वर्षात शाळांना वाईट दिवस आलेत. यावर्षी ऑफलाइन शाळा सुरू असून दहावी, बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्यात. दहावीची परीक्षा आपल्या आयुष्याची पहिली पायरी असून दुसरीकडे लक्ष विचलित न करता विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे. तुमच्याकडून पालकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देऊन यश मिळवावे, असेही पालकवर्गातून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT