Rashmika Mandanna on Rishabh Shetty  Esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna: अखेर रश्मिका नमली! म्हणाली, "रक्षित अन् ऋषभ शेट्टीनी मला मार्ग.."

Vaishali Patil

Rashmika Mandanna on Rishabh Shetty: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि कांताराचे दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांच्याताल वाद काही दिवसांपासून चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ऋषभ शेट्टीच्या 'किरिक पार्टी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

रश्मिकाचा एक व्हिडिओ गेल्याकाही दिवसांपासून व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रश्मिका तिच्या पहिल्या चित्रपटासाठी कास्ट केलेल्या प्रोडक्शनबद्दल बोलताना दिसली मात्र तिने व्हिडिओमध्ये कोणाचेही नाव घेतले नसल्याने नेटकरी तिच्यावर संतापले होते. यानंतर चाहते तिला सतत ट्रोल करु लागले. त्यानंतर ऋषभ शेट्टीनेही आपली प्रतिक्रिया दिली होती

मात्र आता रश्मिकाने नुकतेच 'किरिक पार्टी'च्या यशाचं संपूर्ण श्रेय ऋषभ शेट्टी आणि रक्षित शेट्टी यांना दिले आहे.

रश्मिका मंदान्ना एका मुलाखतीदरम्यान याबद्दल बोलली. ती म्हणाली की, "माझं असं मत आहे की, रक्षित शेट्टी आणि ऋषभ शेट्टी यांनी मला मार्ग दाखवला आहे. तुमचा पहिला चित्रपट येण्याआधी तुमच्यात अभिनेता बनण्याची क्षमता आहे असा विचारही तुम्ही केला नसेल. चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही चांगली संधी दिली."

ती म्हणाली की, रक्षित शेट्टी आणि ऋषभ शेट्टी यांनी मला या इंडस्ट्रीचा रस्ता दाखवला, त्यांच्यामुळेच आज मी माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत चांगल्या लोकांसोबत आणि कलाकारांसोबत काम करू शकलो आहे.

रश्मिकाचा 'मिशन मजनू' नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसला आहे. त्याचवेळी तिचा विजयसोबतचा 'वारीसू' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय तिने 'पुष्पा' चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT