Malaika Arora Gives Arjun Kapoor Valentine's  Day Gift
Malaika Arora Gives Arjun Kapoor Valentine's Day Gift esakal
मनोरंजन

मलायका अरोराने अर्जून कपूरला दिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट

सकाळ डिजिटल टीम

मलायका अरोरा अर्जून कपूर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंड बुडालेले दिसत आहेत. व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) जवळ आल्याने अर्जूनलाही (Arjun Kapoor) मलायकासाठी (Malaika Arora) काय करू असं झालं आहे. म्हणूनच की काय त्याची काळजी लक्षात घेऊन मलायकाने अर्जूनला स्पेशल व्हॅलेंटाईन वीकदरम्यान भन्नाट गिफ्ट (Gift) दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे मलायकाला ज्यापासून जास्त आनंद मिळतो कींवा ज्यामुळे ती इतकी फिट आहे. तेच गिफ्ट तिने अर्जूनला दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे ' फिटनेस जपण्याचा मंत्र' आहे. याविषयी अर्जूननचे इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे.

Arjun Kapoor start iyengar yoga from taking inspiration by malaika arora

जीममध्ये अर्जून जातोच. पण आता त्याने योगाचे धडे घ्यायचं मनावर घेतलं आहे. अय्यंगार योगा करण्याचा नवा प्रवास आपण सुरू केला असून त्या प्रवासाचे क्रेडीट त्याने गर्लफ्रेंड मलायकाला दिले आहे. योगा करतानाचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअऱ केला आहे. अर्जूनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो करत असलेली आसने ही बॉडी पोश्चर सुधारणे, कंबरदुखी या समस्या सोडविण्यासाठी करत असल्याचे म्हटले आहे.

Arjun Kapoor start iyengar yoga from taking inspiration by malaika arora

हा त्रास कमी करण्यासाठी त्याने उष्ट्रासन, राजकपोतासन, वन लेग फॉरवर्ड बेंड अशी तीन आसने केली आहेत. त्यामुळे आता मलायकाच्या सल्ल्यामुळे योगसाधनेत अर्जून तिच्याप्रमाणेच प्रगती करणार असल्याचे दिसते आहे. एकूणच काय शेवटी मलायकाच्या सानिध्यात राहिल्याने फिटनेसचा असर अर्जूनवरही झाला आहे, असं म्हणावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT